Download App

वर्षावर राहायला का जात नाही? राऊतांच्या दाव्यानंतर स्वतः फडणवीसांचा खुलासा

Devendra fadnavis यांनी संजय राऊत यांच्या वर्षा बंगल्यावर राहायला न जाण्यावरून केलेल्या दाव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

Devendra fadnavis explain on Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर राहायला न जाण्यावरून अजब दावा केल्यानंतर स्वतः फडणवीस यांनी त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे.
माध्यमांशी यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, मी वर्ष बंगल्यावर राहायला का जात नाही? यावर माझ्या स्तरावरच्या व्यक्तीने उत्तर देणे योग्य नाही.

मुंबईत रस्ते स्कॅम अन् झोपडपट्टीवर ‘अदानी’ कर; बजेटवरून आदित्य ठाकरेंचा निशाणा

मात्र त्यावरून विविध तर्क लावले जात असल्याने मला त्यावर बोलावं लागते मी वर्ष बंगल्यावर राहायला जात नाही कारण माझ्या मुलीचं दहावीचं वर्ष आहे लवकरच त्याची परीक्षा सुरू होणार आहे त्यामुळे तिने सांगितल्याप्रमाणे आम्ही तिची परीक्षा झाल्यानंतर वर्षा बंगल्यावर राहायला जाणार आहोत त्याचबरोबर वर्षा बंगल्यावर काही काम देखील सुरू आहेत. असही यावेळी फडणवीस म्हणाले.

जेलमध्ये भेटायला वेळ नाही अन् सुटकेनंतर चव्हाणला कडाडून मिठी; मंत्री शिरसाटांचा अदित्य ठाकरेंना टोला

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत नेहमीच (Sanjay Raut) सनसनाटी निर्माण करणारे दावे करत असतात. आताही त्यांनी मुख्यमंत्र्‍यांचे अधिकृत निवासस्थान असणाऱ्या वर्षा बंगल्याबाबत अत्यंत खळबळजनक दावा केला आहे. वर्षा बंगल्यात कुणीतरी जादूटोणा केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस या बंगल्यात जाण्यास तयार नाहीत असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, 13 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, प्रवीण दराडे सहकार खात्याचे सचिव

मुख्यमंत्री होऊन अनेक दिवस उलटून गेल्यानंतरही देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) वर्षा बंगल्यात राहायला गेलेले नाहीत. भारतीय जनता पार्टीच्या वर्तुळात अशी चर्चा आहे की वर्षा बंगल्याच्या बाहेरच्या लॉनमध्ये गुवाहाटीच्या कामाख्या मंदिरात बळी दिलेल्या रेड्याची शिंगे आणून पुरली आहेत.

आम्ही अंधश्रद्धेवर विश्वास ठेवत नाही. पण वर्षा बंगल्यातील कर्मचाऱ्यांत अशी कुजबूज आहे. रेड्याची शिंगे मंतरलेली आहेत. जो कुणी दुसरा मुख्यमंत्री येईल त्याचं मुख्यमंत्रिपद टिकू नये यासाठी ही मंतरलेली शिंगे पुरुन ठेवली आहेत. त्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजूनही वर्षा बंगल्यात राहायला गेलेले नाहीत असा दावा संजय राऊत यांनी केला. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री म्हणून ते राज्याचे काम पाहत आहेत तरीदेखील अधिकृत निवासस्थाना जायला तयार नाहीत. ते अस्वस्थ का आहेत याचे उत्तर महाराष्ट्राला समजले पाहिजे असेही संजय राऊत म्हणाले.

follow us