Download App

फडणवीसांच्या मंत्रिमंडळात फेरबदल होणार, गिरीश महाजनांसह ‘या’ मंत्र्यांना डच्चू, कुणाला मिळणार संधी?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करण्याची शक्यता आहे. त्यात मंत्री गिरीश महाजन यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे.

  • Written By: Last Updated:

Maharashtra Politics: कँटिन कर्मचाऱ्यांना मंत्र्यांनी केलेली मारहाण, विधानभवनाच्या लॉबीत सत्ताधारी पक्षाच्या आमदाराच्या कार्यकर्त्यांनी घातलेला राडा, कृषीमंत्र्यांचा रमी खेळतानाचा व्हिडिओ, या कारणामुळं महायुती सरकार अडचणीत आलं. त्यामुळे जनमाणसात सरकारची प्रतिमा डागळली आहे. याचा फटका आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (Local self-government bodies) निवडणुकांत बसू शकतो. त्यामळं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी (Devendra Fadnavis) आपल्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करण्याची शक्यता आहे. त्यात राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना डच्चू मिळून त्यांच्या जागी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

“हर्षल पाटील सब काँट्रॅक्टर सरकार त्याचे..”, अजित पवारांच्या उत्तराने नवा ट्विस्ट! 

विधानसभा निवडणुकीत भाजपला दैदिप्यमान यश मिळालं होतं. त्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकांसाठी सत्ताधारी महायुती आणि विरोधी बाकावरील मविआने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. परंतु महायुती आपल्या नेत्यांच्या कुरापतीमुळे सातत्याने वादात सापडल्यामुळे सरकाराची प्रतिमा खराब होत आहे. त्यामुळं विरोधकांकडून सरकारची कोंडी होत आहे. त्यामुळं फडणवीस आपल्या मंत्रिमंडळात फेरबदल करू शकतात, असं वृत्त आहे. द न्यू इंडियन एक्सप्रेसमधील वृत्तानुसार, फडणवीस त्यांचे विश्वासू सहकारी गिरीश महाजन यांना मंत्रिमंडळातून डच्चू देऊन त्यांच्या जागी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना संधी देतील.

तमन्ना भाटियाने इंटरनेटवर केला धुमाकूळ, इंडिया कुट्युर वीकच्या रॅम्पवर खास अदा 

नार्वेकर यांनी काही दिवसांपूर्वी सरकारमध्ये मंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली होती. फडणवीस त्यांची इच्छा पूर्ण करतील असा अंदाज आहे. राज्यात सत्ता हस्तांतरण झाल्यापासून, म्हणजेच २०२२ च्या मध्यापासून नार्वेकर विधिमंडळाच्या कनिष्ठ सभागृहाचे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत.

याशिवाय, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनाही विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये मंत्रिपदापासून वंचित ठेवण्यात आलं. त्यामुळं ते नाराज असल्याचे बोलले जातंय. या नाराजीमुळेच ते विधानसभेत सरकारला धारेवधर धरत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आगामी फेरबदलात त्यांनाही संधी मिळेल असे बोलले जात आहे. राहुल नार्वेकर यांच्याकडील विधानसभा अध्यक्षपद मुनगंटीवारांकडे सोपवले जाईल, अशी चर्चा आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेच्या वादग्रस्त मंत्र्यांना या फेरबदलात घरचा रस्ता दाखवण्यात येऊ शकतो. यात सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्यासह संजय, भरत गोगावले, योगेश कदम यांना नारळ दिला जाण्याची शक्यता आहे. याशिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवळ यांच्यावरही मंत्रिपद गमावण्याची नामुष्की येऊ शकते, असे या वृत्तात नमूद करण्यात आले आहे.

 

 

follow us