Download App

3200 कोटींच्या कामांना ब्रेक दिला का? फडणवीसांना केंद्राचं नाव घेत क्लिअरच केलं…

  • Written By: Last Updated:

Devendra Fadnavis : माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या कार्यकाळात घेतलेल्या काही निर्णयांना विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिल्याची चर्चा आहे. आता माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या काळात दिलेले ३,२०० कोटी रुपयांचे काम रद्द करण्यात आल्याचं बोलल्या जातंय. यावर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांन (Devendra Fadnavis) भाष्य केलं. मी कुठल्याही कामांना स्थगिती दिली नसल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलं.

VIDEO : ‘आमच्याकडे बहुमत, कामकाज रेटून नेणार…’ अजितदादांचं विरोधकांना प्रत्युत्तर 

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महायुतीची पत्रकार परिषद झाली. या परिषदेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. यावेळी बोलतांना फडणवीस म्हणाले की, अलीकडच्या शिंदे साहेबांच्या कार्यकाळीतील कामांनी मी स्थिगिती लावल्याच्या बातत्या मला वाचायला मिळतात. पण, मी कुठल्याच कामांना स्थिगितील दिलेली नाही. तरीही मी माझ्या ऑफीसमध्ये फोन करून विचारतो, आपण कधी स्थिगिती दिली आहे? तर आपण स्थिगिती दिली नाही, असं मला ऑफीसमधून कळवल्या जातं. कारण मी स्थिगिती दिलेलीच नसते, असं फडणवीस म्हणाले.

पुढं ते म्हणाले की, आमच्याकडे कुठल्याही आमदाराने निवेदनाद्वारे काही मागणी केली असेल किंवा एखादा आरोप केला असेल तर संबंधित पत्रांवर तपासून कारवाई करावी, असं आम्ही लिहितो. आपण कधीच इग्नोर करत नाही. पण, पत्र गेलं म्हणजे, चौकशी सुरू झाली, स्थगिती दिली असं नसतं. अशा प्रकारच्या बातम्या करणं बाळबोध आहे. कोणताही कारवाई करायची असेल किंवा स्थिगिती द्याची असेल तर दुसरी बाजू ऐकल्याशिवाय, असं स्थगिती देता येत नाही, असं फडणवीस म्हणाले.

VIDEO : आमचा अजेंडा खुर्ची मिळवणं….एकनाथ शिंदे ‘हे’ काय बोलून गेले? 

आरोग्य विभागासाएठी केंद्र सराकरने जो निधी दिला होता. त्या पैशातील 9 टक्के पैसा आपण कॅपिटल एक्सप्लिंटेचरवर खर्च केला होता. मात्र, केंद्राने पाच टक्केच खर्च कॅपिटल एक्सप्लिंटेचर खर्च करायला सांगिता. त्यानुसार संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी आणि सचिवांनी माहिती मागवून आतापर्यंत काय कामे झाली? कुठल्या कामांना विराम द्यायचं, असं ठरवलं. मी कुठल्याच कामाला स्थिगिती दिलेली नाही, असं फडणवीसांना स्पष्ट केलं.

जर कुठं चुकीचं काही होत असेल तर मी नक्कीच कामांना स्थिगिती देईल. जर अजित पवारांच्या किंवा एकनाथ शिंदेंच्या मंत्र्याच्या खात्यात काही चुकीचं होतं असेल तर त्यांच्याशीही बोलेल, असं फडणवीस म्हणाले.

अजित पवार काय म्हणाले?

अधिवेशनात प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याची आमची तयारी आहे, महायुतीचं सरकार चांगलं चालावं, यासाठी आमचा प्रयत्न आहे. राज्य विधिमंडळाचे हे अर्थसंकल्पीय अधिवेशन चार आठवडे चालेल, असं अजित पवार म्हणाले.

follow us