Download App

उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना कायदा कळत नाही; देवेंद्र फडणवीसांचे टीकास्त्र

  • Written By: Last Updated:

Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या शिंदे गट आणि ठाकरे गटाबाबतचं निकालवाचन (Mla Disqualification Case Verdict) काल (दि. 10 जानेवारी) पार पडलं. एकनाथ शिंदे यांचीच खरी शिवसेना (Shiv Sena) असल्याचा निर्वाळा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला. त्याचवेळी त्यांनी शिंदे गटाचे भरत गोगवाले यांचा व्हीप अधिकृत ठरवला. तर ठाकरे गटाचे सुनील प्रभू यांचा व्हीप अवैध ठरला. या निकालामुळं उद्धव ठाकरेंना मोठा फटका बसला. या निर्णयावर आता अनेक प्रतिक्रिया येत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.

Rashmika Mandanna : रश्मिका मंदानाचा हॉट लकू, चाहते घायाळ 

आज माध्यमांशी बोलतांना फडणवीस यांना कालच्या निकालासंदर्भात विचारले असता ते म्हणाले की, काल माननीय अध्यक्षांनी दिलेला निकाल हा अतिशय कायदेशीर प्रकारचा निकाल आहे. विधानसभा अध्यक्षांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील जी शिवसेना आहे, तिलाच मूळ पक्ष म्हणून मान्यता दिली आहे व त्यांना वैध ठरवले आहे. त्यामुळे आता आमचे सरकार पूर्ण मजबूत सरकार आहे. आता कोणाच्या मनात शंका असल्याचे कारण नाही. हेच सरकार राहणार आहे. एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहणार असून आम्ही आमचा पूर्ण कार्याकळा पूर्ण करणार आहेत. सर्वाच्च न्यायालयाने दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिला, त्यासाठी नार्वेकर यांचे अभिनंदन, असं फडणवीस म्हणाले.

Asian Film Festival: आशियाई चित्रपट महोत्सवात मराठवाडा मुक्तिसंग्रामचे विशेष स्क्रिनिंग 

आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालानंतर ठाकरे गट आक्रमक झाला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सडकून टीका केली. तर विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयावर उद्धव ठाकरेंनी तीव्र संताप व्यक्त केला. नार्वेकरांनी नीचपणाचा कळस गाठला आहे. आमची घटना अवैध, मग आमचे आमदार पात्र कसे असा सवाल त्यांनी केला. नार्वेकरांकडून सर्वोच्च न्यायालयाचा अवमान झाला आहे. ते कोर्टालाही जुमानत नाहीत. त्यामुळं त्यांच्याविरोधात अवमानयाचिका दाखल करणार असल्याचं ठाकरे म्हणाले. याविषयी विचारले असता फडणवीस म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना कायदा कळत नाही. त्यांनी कोणाला चोर म्हणावं, डाकू म्हणावं त्याच्याशी आम्हाला काही देणंघेणं नाही. त्यांनी जे बोलयाचं ते त्यांनी बोलाव. पण या निर्णयामुळं ठाकरे गटाची निराशा झाल्याचं ठाकरे म्हणाले.

हुकूमशाहीने पक्ष चालवणाऱ्या नेत्यांना धक्का- एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री म्हणाले, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला निर्णय सगळ्यांचा आहे. सत्तेत आल्यापासून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पद जाणार अशी चर्चा होती. पण, मी अजूनही सत्तेत आहे. हा निर्णय हुकूमशाही पद्धतीने पक्ष चालवणाऱ्यांना धक्का आहे. हा लोकशाहीचा विजय आहे. हा सर्व महाराष्ट्रातील जनतेचा विजय आहे. शिंदे म्हणाले, विरोधकांचा कोणावरही विश्वास नाही. ते निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालालाही जुमानत नाहीत. ते स्वतःला सर्व संस्थांपेक्षा मोठे समजतात. आज मात्र, 2019 मध्ये जनतेशी बेईमानी केल्यानं त्यांना चपराक मिळाली, असं शिंदे म्हणाले.

 

follow us