Devendra Fadnavis On Sharad Pawar : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीच्या (MVA) नेत्यांकडून एकमेकांवर आरोप -प्रत्यारोप सुरु आहे. यामुळे राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. आज कोल्हापूर (Kolhapur) येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी माध्यमांशी बोलताना शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, ही निवडणूक देशाची निवडणूक आहे. पुढील 5 वर्ष देशाचा नेता कोण असणार, देश पुढील 5 वर्ष कुणाच्या हाती सुरक्षित राहिल आणि कोण देशाचा विकास करू शकेल हे ठरवणारी ही निवडणूक आहे.
तर विरोधकांवर टीका करत फडणवीस म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून कोल्हापुरात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांची सभा झाली पाहिजे अशी मागणी लोकांची होती. आज ही सभा होत आहे. कोल्हापूर आणि महाराष्ट्रात पंतप्रधान मोदींना जनतेचा आशीर्वाद मिळणार. विरोधकांना शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत काहीही पडलेलं नाही, असं म्हणत कांदा निर्यात प्रश्नावर फडणवीस यांनी विरोधकांवर टीका केली.
तर शरद पवार यांच्यावर विचारण्यात आलेल्या प्रश्नावर फडणवीस म्हणाले, पंतप्रधान मोदी हे शरद पवार यांच्यासाठी धोक्याचं आहेत असं फडणवीस म्हणाले. याच बरोबर महायुतीमध्ये जागावाटपाचा तिढा सुटला असून येत्या काही दिवसात याची घोषणा होणार आहे असं देखील फडणवीस म्हणाले.
मोठी बातमी! पूनम महाजनचा पत्ता कट, मुंबई उत्तर मध्य मधून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर
आज कोल्हापुरात पंतप्रधान नरेंद्र मोदी महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेत आहे. कोल्हापूर मतदारसंघात महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक (Sanjay Mandalik) विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज (Shahu Maharaj) अशी लढत होणार आहे.