Download App

उद्धवजी, तुम्हाला आता कुठं कुठं आग होतेय; फडणवीसांचा पलटवार

  • Written By: Last Updated:

Devendra Fadnavis : देवेंद्रजी, तुमची परिस्थिती खुप हालाकीची आहे. पूर्वी एक जाहिरात यायची सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही. त्या जाहिरातीचे उत्तम उदाहरण म्हणजे देवेंद्र फडणवीस. (Devendra Fadnavis) होणारे अपमान सहनही होत नाहीत अन् सांगताही येत नाहीत, अशी टीका ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी फडणवीसांवर केली होती. दरम्यान, याचा टीकेला आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धवजींना कुठं कुठं आग होतेय, हे समजतही अन् सागंताही येत नाही, अशा शब्दात जोरदार पलटवार केला. (Devendra Fadnavis on Uddhav Thackeray,Those who did politics sitting at home, they must know what Modi, Shah)

उद्धव ठाकरेंनी चंद्रशेखर बावनकुळे हे मुंबईला महाराष्ट्रापासून तोडणार आहेत, असं वक्तव्य केलं. त्यावर बोलतांना फडणवीस म्हणाले, ज्या ज्या वेळी एखादी व्यक्ती प्रसिद्ध होते, त्या व्यक्तीची भीती उद्धव ठाकरेंना वाटते. आपलं राजकीय अस्तित्वात राहणार नाही, याची भीती वाटते तेव्हा ते सांगतात की, हा मुंबईला तोडणार आहे. हा मुंबईला तोडणार… पण, कुणाचा बाप जरी आला तरी मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होत नाही. उद्धव ठाकरेंची स्क्रिप्ट ठरली आहे. ठाकरेंना भाषणाची स्क्रिप्ट लिहून देणारेही शिंदेसोबत आल्यानं आता ठाकरे जे भाषण करतात, ती कॉंग्रेस-राष्ट्रवादीची स्किप्ट असते, असा टोला ठाकरेंनी लगावला.

SIT करणार बोगस बियाणांची विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दापाश; मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता 

फडणवीस म्हणाले, २०१९ साली भाजचप्या पाठीत खंजीर खपूसून बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली देऊन उद्धव ठाकरे कॉंग्रेस-राष्ट्रवादी सोबत गेले. त्यामुळं आम्ही ठाकरेंचं दुकान बंद केलं. आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात बाळासाहेबांच्या विचारांवर चालणाऱ्या शिंदेंच्या शिवसेनाला उभारी दिली. मी म्हणालो होतो, मै समंदर हू, लोटकर जरूर आऊंगा. मी परत आलोच, पण शिंदेनाही घेऊन आलो. हे फक्त भाषण ठोकत राहतात, ४० आमदार यांच्या नाकाखालून निघून जातात, आणि यांना कळत नाही. उद्धवजी, ४० आमदार गेल्यावर तुमची काय अवस्था झाली? तुम्हाला आता कुठं कुठं आग होतेय, हे समजतही अन् सागंताही येत नाही. आम्हाला ते माहिती आहे, तुम्हाला कशी-कशी अन् कुठं-कुठं आग होते, असा पलटवार फडणवीसांनी केला.

रशिया-युक्रेन यांच्यातील युद्ध मोदींनी थांबवलं, अशी एक भाकड कथा आहे. मणिपुरला शांत करून ही भाकड कथा पंतप्रधान मोदींनी खरी करुन दाखवावी. त्यांनी एकदा मणिपूरला जाऊन दाखवावचं, असं थेट आव्हान उद्धव ठाकरेंनी दिलं होतं. ठाकरेंच्या या वक्तव्याचाही फडणवीस यांनी समाचार घेतला. उध्दव ठाकरेंनी घरात बसून राजकारण केलं. जे घरात बसून राजकारण करतात, त्यांना मोदी, शाह काय ठाऊक असणार, असा टोला फडणवीसांनी लगावला.

आगामी लोकसभा निवडणुकीत मोदींचा पराभव करण्यासाठी विरोधक पाटण्यात एकत्र येत आहेत. यावरून फडणवीसांनी विरोधकांवर टीका केली. ते म्हणाले, मोदींचा पराभव करण्यासाठी विरोधक पाटण्यात एकत्र येणार आहोत. २०१९ मध्ये देखील विरोधक एकत्र आले होते. पण, मोदीचं काहीचं वाकडं करू शकले नाही. आता देखील कितीही वेली एकत्र आल्या तरी वटवृक्षाचं वाकडं करू शकत नाही, असं फडणवीस म्हणाले.

Tags

follow us