Download App

“धर्मवीर ३ चित्रपटाची पटकथा मी लिहीणार” गुगली प्रश्नावर फडणवीसांचं सेफ उत्तर

Devendra Fadnavis : राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहू (Maharashtra Elections) लागले आहे. चित्रपट क्षेत्रही याला अपवाद नाही. शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख दिवंगत आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारीत धर्मवीर 2 हा चित्रपट (Dharmaveer 2) प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. गुरुवारी या चित्रपटाचा ग्रँड प्रीमियर सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (Devendra Fadnavis) हजेरी लावली. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

या चित्रपटाची सगळ्यांना उत्सुकता होती. लोक वाट पाहत होते. या चित्रपटाचा दुसरा भाग कधी पाहण्यास मिळतो अशा प्रकारची उत्कंठा होती. धर्मवीर 2 हा चित्रपटही प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. कारण हा चित्रपट सत्यकथेवर आधारीत आहे. ज्या लोकांचं चरित्र आपण पाहिलंय वाचलंय अशा चरित्र नायकांच्या संदर्भातला हा सिनेमा असल्याने लोकांना निश्चितपणे आवडेल.

Dharmaveer 2 : धर्मवीर 3 मध्ये काय असेल? प्रसाद ओक स्पष्टच बोलला, म्हणाला- लोकांना वाटतं 

राज्यात एकनाथ शिंदे यांच्या (Eknath Shinde) नेतृत्वात राजकीय भूकंप झाला. त्यानंतर धर्मवीर 2 हा सिनेमा आला पाहिजे अशी अनेकांची मागणी होती. धर्मवीर 1 चित्रपटाला लोकांनी डोक्यावर घेतलं. लोकांना हा चित्रपट अतिशय आवडला. ज्या लोकांचं चरित्र आपण पाहिलंय वाचलंय अशा चरित्र नायकांच्या संदर्भातला हा सिनेमा असल्याने लोकांना निश्चितपणे आवडेल. आता दुसरा भागही लोकांना नक्कीच आवडेल असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

यानंतर पत्रकारांनी चित्रपटाच्या पुढील भागात तुमची काही भूमिका असेल का किंवा तुम्ही एखादा चित्रपट काढणार आहात का असा सवाल विचारला. त्यावर फडणवीसांनी अतिशय मिश्कील उत्तर दिलं. त्यांच्या याच वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे. “ज्यावेळी धर्मवीर ३ सिनेमा येईल तेव्हा त्याची पटकथा मी लिहीन.” असे उत्तर फडणवीसांनी देताच एकच हशा पिकला.

लोकसभेला आमची कामगिरी वाईट, भाजप कमकुवत…; देवेंद्र फडणवीसांची कबुली

धर्मवीर-2 आज चित्रपटगृहात

‘धर्मवीर-2′ चित्रपटाची चाहते मोठ्या आतुरतेने वाट पाहत होते. ’धर्मवीर-2’ चित्रपटाचा नवा ट्रेलर काही दिवसांपूर्वी समोर आला होता. या ट्रेलरमध्ये चित्रपट प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार ‘धर्मवीर-2’ चित्रपट आज राज्यातील चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या अगोदर चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती. आता मात्र आज हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

follow us