Download App

Maharashtra Politics : तुम्ही मुख्यमंत्री होणार का? फडणवीसांना पत्रकारांना जोडले हात, ‘तिन्ही पक्ष…’

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार अशी चर्चा सुरू आहे. याविषयी विचारले असता फडणवीसांनी कोणताही प्रतिक्रिया न देता केवळ पत्रकारांना हात जोडले.

  • Written By: Last Updated:

Devendra Fadnavis : गेल्या अडीच वर्षांपासून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेले कनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पत्रकार परिषद घेत भाजपला (BJP) पाठिंबा जाहीर केला आणि मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडला. पंतप्रधान मोदी आणि अमित शाह (Amit Shah) मुख्यमंत्री पदासाठी जो निर्णय घेतील, तो प्रत्येक निर्णय मान्य असेल असं शिंदेंनी जाहीर केलं. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आमच्या महायुतीमध्ये कुठलेही मतभेद नाहीत, असं म्हटलं. मुख्यमंत्री होणार का, असा सवाल केला असता फडणवीसांनी हात जोडले.

विशाखा कशाळकर संपादित ‘एकांकिका’ पुस्तकाचे 30 नोव्हेंबरला होणार प्रकाशन… 

एकनाथ शिंदे यांच्या पत्रकार परिषदेनंतर फडणवीस यांनी नागपुरात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून पुढील वाटचाल ठरवली जाणार असल्याचंही सांगितलं.

यावेळी फडणवीस म्हणाले, शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील, निश्तिचपणे आम्ही सगळे एकत्रितच आहोत. आमच्या महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. आम्ही निवडणुकीच्या पूर्वी देखील सांगितले होते की, सगळे निर्णय सोबत बसून होतील. आमचे वरिष्ठ असतील ते आमच्या सोबत बसून सर्व निर्णय घेतील. त्यामुळे मला असे वाटते की कोणाच्याही मनात किंतू परंतु असेल तर एकनाथ शिंदे साहेबांनी तो देखील दूर केलाय, असं फडणवीस म्हणाले.

‘सुपरस्टार बहू कॉम्पिटिशन’ बाबत नकुल मेहताने केला मोठा खुलासा, म्हणाला… 

यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार अशी चर्चा सुरू आहे. याविषयी विचारले असता फडणवीसांनी कोणताही प्रतिक्रिया न देता केवळ पत्रकारांना हात जोडले.

पुढं फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्रीपदाबाबतचा निर्णय लवकरच होईल. तीनही पक्ष मिळून लवकरच मुख्यमंत्रीपदाबाबतच निर्णय घेतील. आम्ही सगळे पक्षश्रेष्ठींशी चर्चा करत आहोत. लवकरच आपल्याला याचे उत्तर मिळेल. आधी मुख्यमंत्री ठरेल आणि मुख्यमंत्री ठरल्यानंतर ते मंत्रिपदे कोणाला द्यायची हे ठरवतील, असं फडणवीस म्हणाले.

 

follow us