Devendra Fadnvis : देशातील पाच राज्यांच्या नूकत्याच निवडणुका पार पडल्या. या पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळालं आहे. पाचपैकी तीन राज्यांत भाजपने मुसंडी मारल्याने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये रणकंदनच सुरु झाल्याची परिस्थिती आहे. अशातच हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnvis) विरोधकांवर घणाघाताचं सत्रच सुरु केल्याचं पाहायला मिळालं. नागपूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेतून ते बोलत होते.
Animal मधील फायटर मशीनगन महाराष्ट्रात बनली; 18 मिनिटांच्या सीन्ससाठी मोजले एक कोटी
देवेंद्र फडणवीस म्हणाले, विरोधकांच्या पत्रकार परिषदेत काही लोकं झोपले होते, तीन राज्यात जसे झोपले तसे पत्रकार परिषदेतही झोपले होते. तशाच झोपेत विरोधकांनी पत्र लिहिलं आहे का? असा प्रश्न पडावा असं पत्र दिलं असल्याचं फडणवीस म्हणाले आहेत.
Khushi Kapoor चा आई श्रीदेवीला अनोखा ट्रीब्युट; अर्चिजच्या प्रीमिअरला परिधान केला ‘तो’ ड्रेस
तसेच नागपूरचं अधिवेशन विदर्भ, मराठवाडा प्रश्नावर चर्चा व्हावी यासाठी अधिवेशन असतं, पण विरोधकांच्या पत्रात मराठ्यावाड्यांचा प्रश्नांचा उल्लेखच नाही त्यांना विसर पडलेला आहे असं पत्रावरुन दिसत आहे. राज्यात काय चाललंय याचं भानही त्यांना नाही . त्यांनी कंत्राटी भरतीच्या जीआरचा विषय काढला आहे. उद्धव ठाकरे यांच्या सहीने निघालेला जीआर एकनाथ शिंदेंनी रद्द केला हे देखील विरोधी पक्षाला माहित नाही त्यांची अवस्था आपण बघितली पाहिजे, अशी खरमरीत टीकाही फडणवीस यांनी केली आहे.
Jitendra Awhad : ‘दादा माझं सोडा, तुमची ढेरी दाखवतो’; फोटो ट्विट करत आव्हाडांचा खोचक टोला
पुढच्या वेळी पानसुपारी ठेवावी लागेल…
अधिवेशनादरम्यान चहापानाचा कार्यक्रम हा चर्चेसाठी असतो. विरोधकांचा स्वभाव पाहता पुढील वेळी पान सुपारी ठेवावी लागेल म्हणजे ते येतील, अशी शक्यता असल्याची टोलेबाजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
‘भाजप फक्त ‘गौमुत्र राज्यांत’ निवडणूक जिंकतं’; द्रमुकच्या खासदाराने टाकली वादाची ठिणगी
ईव्हीएममुळे जिंकले असं विरोधक आता म्हणत आहेत. तसेच दक्षिण भारत विरुद्ध उत्तर भारत होतंय, असं म्हणत विरोधकांनी पराभवाचं समाधान करुन घेतलं आहे. आगामी लोकसभेतही विरोधकांचं यापेक्षाही अधिक पानिपत होणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितलं आहे.