Download App

संजय राऊतांच्या विधानावर धनंजय मुंडेंनी ठेवलं बोट! म्हणाले, राऊत पवार कुटुंबाचे..,

Dhananjay Munde : संजय राऊत हे शरद पवार यांच्या कुटुंबाचे सदस्य झालेत काय? असा खोचक सवाल उपस्थित करीत कृषिमंत्री धनंजय मुंडे(Dhanajay Munde) यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांच्या(Sanjay Raut) विधानावर बोट ठेवलं आहे. अजित पवारांनी(Ajit Pawar) आता शरद पवारांच्या संस्थेतील राजीनामा द्यावा, असं संजय राऊत म्हणाले होते. त्यावरुन आता राऊत-मुंडे यांच्यात चांगलीच जुंपल्याचं दिसून येत आहे. बीडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

‘प्रत्युत्तर सभेतून नाहीतर आगामी निवडणुकीत..,’; शरद पवारांनंतर धनंजय मुंडेंचाही आक्रमक पवित्रा

मंत्री धनंजय मुंडे म्हणाले, संस्थेतील राजीनाम्याचा प्रश्न हा अजित पवार आणि शरद पवार एकत्र मिळून निर्णय घेतील. कारण हा त्यांचा कौटुंबिक प्रश्न आहे, संजय राऊत हे पवार कुटुंबाचे सदस्य झाले आहेत का? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

माजी परराष्ट्र मंत्र्यांना अटक, पाकिस्तानमध्ये राजकीय अस्थिरता कायम

संजय राऊत म्हणाले :
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची साथ सोडून भाजपशी घरोबा करून सत्तेत सहभागी झालेले अजित पवार यांनी आता शरद पवार यांच्या संस्थेतील देखील पदाचे राजीनामे द्यावेत असे विधान संजय राऊत यांनी केले होते.

रायडर लूकमध्ये राहुल गांधी! लडाखमधील पॅंगॉन्ग त्सो तलावावर पोहोचले

तसेच इतरही मुद्द्यांवर भाष्य करीत त्यांनी अजित पवार गटाच्या सभेबाबत माहिती दिली आहे. ते म्हणाले, येत्या 27 तारखेला बीडमध्ये अजित पवार गटाची सभा होणार आहे. नूकतीच शरद पवारांची सभा पार पडली. यावेळी बबन गीते यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यामुळे बीडमधून धनंजय मुंडे यांच्यावर शरद पवारांनी डाव टाकल्याची चर्चा सुरु आहे. त्यावरही मुंडेंनी सडेतोडपणे भाष्य करीत म्हणाले, मी आत्तापर्यंत आयुष्यात खूप संघर्ष केला आहे. माझ्यासमोर कुठलंही आव्हान उभं नसल्याचं स्पष्टीकरण त्यांनी बबन गीतेंच्या पक्षप्रवेशावर दिलं आहे.

दरम्यान, 27 तारखेची सभा ही यापूर्वीच होणार होती, मात्र काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे 17 तारखेला झालेल्या शरद पवार यांच्या सभेला उत्तर देण्यासाठी ही सभा नसून बीड जिल्ह्याची अस्मिता, विकास सन्मानाची सभा आहे. 17 तारखेला झालेल्या सभेला 2024 मध्ये जनता जनार्दन उत्तर देणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

Tags

follow us