माजी परराष्ट्र मंत्र्यांना अटक, पाकिस्तानमध्ये राजकीय अस्थिरता कायम
Pakistan News : पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री आणि तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) चे उपाध्यक्ष शाह महमूद कुरेशी यांना त्यांच्या इस्लामाबाद येथील घरातून अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानी जिओ न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने (एफआयए) कुरेशीला सध्या सुरू असलेल्या सायफर चौकशीच्या संदर्भात ताब्यात घेतले आहे. त्याचवेळी काळजीवाहू सरकारवर आमचा पक्ष फोडण्यासाठी ही अटक करण्यात असल्याचा आरोप पीटीआय पक्षाने केला आहे.
पाकिस्तानच्या माजी परराष्ट्रमंत्र्यांच्या अटकेची बातमी पक्षाने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून दिली आहे. पीटीआयचे उपाध्यक्ष शाह मेहमूद कुरेशी यांना पुन्हा एकदा बेकायदेशीरपणे अटक करण्यात आल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले आहे. पक्षाने सांगितले की, माजी परराष्ट्र मंत्र्यांना नंतर मोठ्या पोलिसांच्या ताफ्याने ताब्यात घेतले.
मोठी बातमी! दिल्ली विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडली 35 काडतुसे
पीटीआयचे सरचिटणीस उमर अयुब खान यांनी माजी परराष्ट्र मंत्री आणि पक्षाचे उपाध्यक्ष यांच्या अटकेवर आपली प्रतिक्रिया दिली. या घटनेचा मी तीव्र निषेध करतो असे ते म्हणाले. फॅसिस्ट पीडीएम सरकार गेल्यानंतर अराजकतेचे राज्य संपेल अशी अपेक्षा होती, परंतु हे काळजीवाहू सरकार आपल्या पूर्ववर्ती, फॅसिस्ट सरकारचा विक्रम मोडू इच्छित असल्याचे दिसून येते, असे त्यांनी म्हटले.
लडाखमध्ये मोठी दुर्घटना; लष्कराचे वाहन दरीत कोसळल्याने 9 जवान शहीद
दरम्यान, काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर पाकिस्तानची संसद विर्सजित करण्यात आली आहे. त्यानंतर अन्वर काकड यांना पाकचे 8 वे काळजीवाहू पंतप्रधान म्हणून निवडले आहे.