Dhananjay Munde Resignation : गेली तीन महिन्यांपासून संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप होत होते. त्यांचा राजकीय वरदहस्त असल्याने हे घडलं असा थेट आरोप होत होते. काल संतोष देशमुख यांना मारहाण केल्याचे फोटो समोर आले. त्यानंतर महाराष्ट्रात वातावरण तापलं होत. (Munde) काल रात्री मुख्यमंत्री देवेंद्र उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनिल तटकरे, प्रफुल पटेल यांच्यात बैठक झाली. त्यावेळीच मुख्यमंत्री फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर मुंडे यांनी राजीनामा दिला आहे. तो राजीनामा मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला आहे.
धनंजय मुंडे यांचे पीए मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेले आहेत. त्यांच्याकडे राजीनाम्याचं पत्रही आहे. त्यामुळे तब्बल दोन महिन्यानंतर धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला आहे. पीए राजीनाम्याचं पत्र घेऊन गेल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा स्वीकारला आहे. दरम्यान, यावेळी माध्यमांनी अजित पवार यांना विचारलं असता ते रागावल्याचं दिसलं. त्यावेळी पंकजा मुंडे यांना विधीमंडळ परिसरात पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांना विचारलं असता त्यांनी काही माहिती नाही अशी प्रतिक्रिया दिली.
या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यासह नऊ आरोपींना मोक्का कायद्याखाली अटक देखील झाली. त्यानंतर कोर्टात या सर्व हत्याकांडाचा सूत्र वाल्मिक कराड हाच असल्याचे उघडकीस आले. कोर्टात या प्रकरणात दाखल केलेल्या आरोपपत्रात अखेर ही हत्या कशी झाले त्याच्या 15 व्हिडीओ आणि 8 फोटो पुरावा सादर करण्यात आले आहेत. या फोटोंना पाहून आरोपींनी हैवानालाही लाजवले असे कृत्य केल्याचे स्पष्ट झाले आहे.जयराम चाटे, कृष्णा आंधळे, महेश केदार, सुदर्शन घुले, प्रतिक घुले यांनी हैवानाला लाजवेल असे काम केले आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री ?
धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे राजीनामा दिला आहे. तो मी स्वीकारलेला आहे. तो राजीनामा पुढील कारवाईसाठी राज्यपालांकडे पाठवला आहे. असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते विधिमंडळ परिसरात माध्यमांशी बोलत होते.
🕚 10.48am | 4-3-2025📍Mumbai.
LIVE | Media interaction #Maharashtra #Mumbai https://t.co/LAr3TPjus5
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 4, 2025
Mumbai, Maharashtra: Minister and senior NCP leader Dhananjay Munde has submitted his resignation. pic.twitter.com/Yesymhjcu9
— IANS (@ians_india) March 4, 2025