Download App

Dhangar Reservation : ‘निवदेन घ्यायला कोणी आलंच नाही म्हणूनच..,; दगडफेक प्रकरणावर पडळकर बोलले

Dhangar Reservation : मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत आहेच, अशातच आता धनगर आरक्षणाचा मुद्दाही चांगलाच तापला आहे. विविध मागण्यांसाठी निवेदन देण्यासाठी गेलेल्या धनगर आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक केल्याची घटना जालन्यात घडलीयं. या घटनेवर बोलताना निवेदन घ्यायला कोणी आलंच नसल्यानेच आंदोलकांनी संताप व्यक्त केला असल्याची प्रतिक्रिया भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी(Gopichand Padalkar) दिली आहे. पडळकरांनी मुंबईतून माध्यमांशी संवाद साधला.

‘एक अपघात अन्…’; पंकज त्रिपाठींच्या ‘कडक सिंग’ सिनेमाचा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

गोपीचंद पडळकर म्हणाले, धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत अंमलबजावणी करण्यासाठी निवेदन देण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. संपूर्ण राज्यभर हा कार्यक्रम शांतपणे पार पडला. जालन्यात जवळपास २५ ते ३० हजार लोक मोठ्या संख्येने कलेक्टर ऑफिसवर येणार आहेत, तर तुम्ही निवेदन घेण्यासाठी यावे, अशी विनंती करण्यात आली, जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन घेण्यासाठी येण्याचे देखील आश्वासनही दिले, मात्र निवेदन घेण्यासाठी जिल्हाधिकारी खाली यायला तयार नव्हते, कोणताही सक्षम अधिकारी देखील खाली आला नसल्याने संतप्त आंदोलकांनी संताप व्यक्त केलं असल्याचं गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत.

प्रिया बापट नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत 90च्या दशकातील थ्रिलरमध्ये दिसणार मुख्य भूमिकेत

तसेच एक तास वाट पाहिल्यावर कार्यकर्त्यांनी आव्हान केले तुम्ही खाली या नाहीतर आम्ही वर येऊ तरीसुद्धा त्याची दखल कोणी घेतली नाही, यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संताप निर्माण झाला आणि काही कार्यकर्ते जिल्हाधिकारीच्या कार्यालयात जाऊन तोडफोड केली. प्रशासकीय अधिकाऱ्यांना या सगळ्या गोष्टींना गांभीर्याने घेण्याची आवश्यकता होती, असंही पडळकर म्हणाले आहेत.

Ashish Shelar : ‘राऊतांकडे 27 तर आमच्याकडे 270 फोटो’; भाजप नेत्याचा इशारा काय?

विविध मागण्यांसाठी धनगर समाजाने आज जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला होता. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर पोहचल्यानंतर बराच वेळ होऊन सुद्धा प्रशासनाच्यावतीने मोर्चेकरांचे निवेदन स्वीकारण्यास कोणीही लवकर न आल्याने संतप्त आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटमध्ये बळजबरीने प्रवेश केला. तसेच कार्यालयासमोर असलेल्या अधिकाऱ्यांच्या गाड्यांची तसेच कार्यालयाच्या काचा फोडल्या.

या घटनेनंतर परिसरातील वातावरण तणावग्रस्त झाले होते. धनगर समाजाला एसटी म्हणजेच अनुसूचित जमाती आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी, या मागण्यांसाठी धनगर समाजाच्या वतीने आज जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. शहरातील गांधी चमन येथून निघालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला, पण मोर्चाचे निवेदन स्वीकारण्यासाठी अधिकारी येण्यासाठी उशीर करीत आहेत, असा आरोप करत आंदोलक संतप्त झाले. या संतप्त आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या काचा फोडल्या तर वाहनांची तोडफोड केली. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात एकच धावपळ उडाली होती.

Tags

follow us