मुंबई : अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी आज मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे शरद पवारांची (Sharad Pawar) भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमांशी बोलतांना आमच्यात कोणती राजकीय चर्चा झाली नसल्याचं प्रतिक्रिया त्यांनी दिली. निवडणुकीत ट्रम्पेट चिन्हाचा (Trumpet) मला लाभ झाल्याचं जाहीरपणे माध्यमांसमोर मान्य केलं.
निवडणूक मोठ्या मताधिक्याने कशी जिंकली? जितेंद्र आव्हाडांनी केला मोठा खुलासा
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या बैठकीसाठी वळसे पाटील मुंबईत आले होते. यावेळी त्यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये शरद पवारांची भेट घेतली. यानंतर माध्यमांशी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. या भेटीविषयी बोलतांना वळसे पाटील म्हणाले की, आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आल्याने मी या बैठकीसाठी आलो. प्रतिष्ठानचा विश्वस्त या नात्याने मी या बैठकीला हजर होतो. बैठकीमध्ये वेगवेगळ्या विषयावर उपयुक्त अशी चर्चा झाली, या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असं वळसे पाटील म्हणाले.
सुरेश धस सोपे नाहीत… मुंडे बंधू-भगिनींना पुरून उरणार!
दिलीप वळसे पाटलांनी आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. निवडणुकीत मतदार संघात ट्रम्पेटने मते घेतली, त्याचा लाभ आपल्यला झाला असल्याचे वळसे पाटील यांनी म्हटले आहे.
मलाही ट्रम्पेटचा फायदा
अजितदादांच्या अनेक उमेदवारांना ‘ट्रम्पेट’ या निवडणूक चिन्हाचा फायदा झाला. याविषयी विचारले असता ते वळसे पाटील म्हणाले की, होय, मलाही ट्रम्पेटचा फायदा झाला, असं जाहीरपणे माध्यमांसमोर मान्य केले. माझ्या इथे ट्रम्पेटने मते घेतली. मात्र इतर मतदारसंघात कुणाला किती फायदा झाला हे माहीत नसल्याचे ते म्हणाले.
मी पवार साहेबांचे आशीर्वाद घेतले...
शरद पवारांनी तुमच्या मतदारसंघात जाऊन गद्दारांना पाडा, असं म्हटलं होतं. पण, आता तुमच्या विजयानंतर त्यांनी तुमचे अभिनंदन केले का? या प्रश्नावर वळसे-पाटील म्हणाले की, शरद पवार यांचे मी आशीर्वाद घेतले. ते सभेत काय बोलले आणि काय नाही हे सर्व मी विसरून गेलेलो आहे. मी फक्त त्यांचे दर्शन घेतलं आणि आशीर्वाद घेतले. बाकी काही नाही, असं वळसे पाटील म्हणाले.
राम शिंदेंच्या आरोपांत तथ्य नाही…
भाजपचे नेते राम शिंदे यांनी केलेल्या आरोपावर बोलताना दिलीप वळसे पाटील म्हणाले की, तसे काही झाले असावे, असे मला वाटत नाही. दोन्ही पवार एकत्र येण्याबाबत अजून तशी चर्चा, विचार समोर आलेला नाही, असे वळसे पाटील म्हणाले. शिंदे यांच्या आरोपात तथ्य नाही. मुख्यमंत्री पदाबाबत आमचे व महायुतीच्या पक्षांचे वरिष्ठ नेते एकत्र बसून निर्णय घेतील, असंही वळसे पाटील यांनी म्हटले आहे
आंबेगावमध्ये ट्रम्पेट चिन्हावरील उमेदवाराला 2965 मते
पुण्यातील आंबेगाव मतदार संघातून अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांचा निसटता विजय झाला. त्यांच्याविरोधात शरद पवार यांनी देवदत्त निकम यांना उमेदवारी दिली होती. त्यांचा 1523 मतांनी पराभव झाला. मात्र ट्रम्पेट चिन्हावर उभ्या असणाऱ्या उमेदवाराला 2965 मते मिळाली आहेत. विशेष म्हणजे या ट्रम्पेट चिन्हावर उभ्या असलेल्या उमेदवाराचे नावही देवदत्त निकम हेच होते.