Download App

मोठी बातमी! विधानसभा निवडणूकीनंतर वळसे पाटलांनी घेतली पवारांची भेट, कारणही समोर…

र दिलीप वळसे पाटलांनी (Dilip Walse Patil) आज शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. त्यामुळं चर्चांना उधाण आलं

  • Written By: Last Updated:

Dilip Walse Patil Met Sharad Pawar : विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) निकालानंतर राज्यात प्रचंड घडामोडी घडत आहेत. महायुतीला (Mahayuti) स्पष्ट बहुमत मिळाल्याने महायुतीचं सरकार राज्यात स्थापन होणार आहे हे स्पष्ट झालं. अशातच आता अजित पवार गटाचे नवनियुक्त आमदार दिलीप वळसे पाटलांनी (Dilip Walse Patil) आज शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. त्यामुळं चर्चांना उधाण आलं. दरम्यान, या भेटीनंतर वळसे पाटलांनी माध्यमांशी संवाद साधतांना भेटीचं कारण सांगितलं.

अमेरिकन सैन्यातून तृतीयपंथीयांना काढून टाकलं जाणार? डोनाल्ड ट्रम्प मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत 

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या बैठकीसाठी वळसे पाटील मुंबईत आले होते. यावेळी त्यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये शरद पवारांची भेट घेतली. शरद पवारांनी विधानसभा निवडणुकीत वळसे पाटलांना आव्हान दिलं होतं. त्यानंतर ही पहिलीच भेट आहे. दरम्यान, या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना वळसे पाटील म्हणाले की, आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आल्याने मी या बैठकीसाठी आलो. प्रतिष्ठानचा विश्वस्त या नात्याने मी या बैठकीला हजर होतो. बैठकीमध्ये वेगवेगळ्या विषयावर उपयुक्त अशी चर्चा झाली, अशी माहिती वळसे-पाटील यांनी दिली.

अमेरिकन सैन्यातून तृतीयपंथीयांना काढून टाकलं जाणार? डोनाल्ड ट्रम्प मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत 

या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. निकालांच्या संदर्भात चर्चा झाली. पण ती चर्चा महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या मतदारसंघात काय का घडलं, याबाबत होती. बाकी केवळ प्रतिष्ठानच्या संदर्भात चर्चा झाली, असं वळसे पाटील म्हणाले.

शरद पवारांनी तुमच्या मतदारसंघात जाऊन गद्दारांना पाडा, असं म्हटलं होतं. पण, आता तुमच्या विजयानंतर त्यांनी तुमचे अभिनंदन केले का? या प्रश्नावर वळसे-पाटील म्हणाले की, शरद पवार यांचे मी आशीर्वाद घेतले. ते सभेत काय बोलले आणि काय नाही हे सर्व मी विसरून गेलेलो आहे. मी फक्त त्यांचे दर्शन घेतलं आणि आशीर्वाद घेतले. बाकी काही नाही, असं वळसे पाटील म्हणाले.

मलाही ट्रम्पेटचा फायदा
अजितदादांच्या अनेक उमेदवारांना ‘ट्रम्पेट’ या निवडणूक चिन्हाचा फायदा झाला. याविषयी विचारले असता ते वळसे पाटील म्हणाले की, मलाही ट्रम्पेटचा फायदा झाला, असं जाहीरपणे माध्यमांसमोर मान्य केले. मात्र इतर मतदारसंघात कुणाला किती फायदा झाला हे माहीत नसल्याचे ते म्हणाले.

अजित पवारांची शरद पवार गटाच्या आमदारांसोबत गुप्त बैठक?

अजित पवार यांची शरद पवार गटाच्या आमदारांसोबत गुप्त बैठक सुरू असल्याची चर्चा आहे. या आमदारांचा राष्ट्रवादीत प्रवेश होऊ शकतो, अशीही चर्चा आहे. तुम्हाला याबद्दल काही कल्पना आहे का? असा सवाल वळसे पाटील यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी मला याबद्दल कोणतीही कल्पना नाही, असं सांगितलं. माझ्याशी तरी कुणाचं याबाबतीत बोलणं झालेलं नाही, त्यामुळं कोण येणार वगैरे याबाबत आता बोलणं उचित नाही, तशी कुठे चर्चा झाली असेल असं मला वाटतही नाही, असं वळसे पाटील म्हणाले.

 

 

follow us