Disqualification MLA : निकालाआधीच राहुल नार्वेकर CM शिंदेंच्या भेटीला; चर्चांना उधाण

Rahul Narvekar-Cm Shinde Meeting : पुढील दोन-तीन दिवसांतच अपात्र आमदार प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्याकडून निकाल हाती येणार आहे. मात्र, निकालाच्या दोन दिवसांआधीच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या वर्षा निवासस्थानी दाखल झाले आहेत. निकालाआधीच नार्वेकर शिंदेंची भेट घेत असल्याने या भेटीकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. नाशिक : […]

शिंदेंची खुर्ची जाणार? हे आहेत राहुल नार्वेकर यांच्यासमोरचे चार पर्याय

Letsupp Image 2024 01 02T174558.419

Rahul Narvekar-Cm Shinde Meeting : पुढील दोन-तीन दिवसांतच अपात्र आमदार प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्याकडून निकाल हाती येणार आहे. मात्र, निकालाच्या दोन दिवसांआधीच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या वर्षा निवासस्थानी दाखल झाले आहेत. निकालाआधीच नार्वेकर शिंदेंची भेट घेत असल्याने या भेटीकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.

नाशिक : महायुतीत हेमंत गोडसे फिक्स; ‘मविआ’मध्ये ठाकरेंची मोर्चेबांधणी अन् पवारांचीही चाचपणी

शिवसेनेत सत्तासंघर्ष झाल्यानंतर अपात्र आमदार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्य विधी मंडळात सुनावणी सुरु होती. मागील दोन महिन्यांपासून सुनावणी सुरु होती. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या देखरेखीखाली ही सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान, शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटाच्या वकीलांकडून भक्कमपणे आपली बाजू मांडण्यात आली. सुनावणीत दोन्ही वकीलांकडून जोरदार युक्तिवाददेखील करण्यात आल्याचं पाहायला मिळालं आहे.

शरद मोहोळ हत्याप्रकरण: मुख्य आरोपीसह आठ जणांना पोलिस कोठडी; पण वकिलांचा वेगळाच युक्तिवाद

या प्रकरणात 20 डिसेंबरपर्यंत सुनावणी झाली आहे. त्यानंतर निकाल राखून ठेवण्यात आला आहे. निकाल देताना विधानसभा अध्यक्षांना दोन्ही बाजूंचे दस्तावेज वाचून अभ्यास करून निकाल द्यावा लागणार आहे. त्यामुळे निकाल देण्यासाठी काही वेळ लागणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणी निर्णय घेण्यासाठी तीन आठवड्यांची मुदत देण्याची मागणी राहुल नार्वेकर यांनी न्यायालयाला केली होती. त्यानंतर न्यायालयाने 10 जानेवारीपर्यंतच मुदत दिली आहे.

‘आमच्या राजकीय प्रयोगाचं कथानक चांगलं, विचार करा’; CM शिंदेंची पटेलांना थेट चित्रपटाचीच ऑफर

आधी अपात्र आमदार प्रकरणी 31 डिसेंबरपर्यंत निर्णय घ्या, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. तरीही तीन आठवड्यांची मुदतवाढ द्या, अशी मागणी राहुल नार्वेकर यांनी न्यायालयाकडे केली होती. नार्वेकर यांची ही मागणी न्यायालयाने मान्य केली आहे. मात्र, दहा दिवसांचीच मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे आमदार अपात्रता प्रकरणात सुनावणी घेऊन निर्णय घेण्यासाठी राहुल नार्वेकर यांना 10 जानेवारीपर्यंत द्यावा लागणार आहे. अशातच आता राहुल नार्वेकरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी दाखल झाल्याने या भेटीला अधिक महत्व प्राप्त झालं आहे.

दरम्यान, या भेटीदरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राहुल नार्वेकर यांच्यात नेमकी कोणत्या विषयांवर चर्चा केली जाणार आहे, हे अद्याप अस्पष्ट असून निकालाआधी ही भेट होत असल्याने अपात्र आमदारांप्रकरणी चर्चा केली जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Exit mobile version