Download App

Disqualification MLA : राजकीय संघर्ष संपला नाही; नार्वेकरांविरोधात ठाकरे गटाची सर्वोच्च न्यायालयात धाव

Disqualification MLA : शिवसेनेच्या अपात्र आमदार प्रकरणावर (Disqualification Mla) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी (Rahul Narvekar) निकाल दिल्यानंतर आता ठाकरे गटाकडून जोरदार पाऊलं उचलली जात आहेत. राहुल नार्वेकरांनी एकनाथ शिंदे यांचा गटाची शिवसेना (Shivsena) खरी असल्याचा निकाल दिला आहे. तर शिंदे आणि ठाकरे गटाच्या दोन्ही आमदारांना पात्र ठरवलं आहे. नार्वेकरांच्या या निकालाविरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय संघर्ष अद्याप संपला नसल्याचं दिसून येत आहे.

सिद्दिकीच्या खुनाचा बदला म्हणून मोहोळची गेम? हिंदुत्ववादी संघटनांना अतिरेकी हल्ल्याचा संशय

शिवेसेनेत बंड झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपशी हात मिळवणी करुन राज्यात सत्तास्थापन केली. त्यानंतर ठाकरे गटाकडून अपात्र आमदार, पक्ष, चिन्हासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. पक्ष आणि चिन्हाप्रकरणी निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांचा गटच खरी शिवसेना असून धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला दिल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यानंतर ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं.

सर्वोच्च न्यायालयात या याचिकांवर सुनावणी झाल्यानंतर अखेरीस न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे अपात्र आमदार प्रकरणाचा निकाल सोपवला होता. त्यानंतर राज्य विधी मंडळात राहुल नार्वेकरांच्या देखरेखीखाली शिवसेनेच्या अपात्र आमदार प्रकरणाची सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान, शिवसेना पक्षाची घटना, दस्ताऐवज, साक्ष आणि पुराव्यांची तपासणी करण्यात आली. यादरम्यान, शिंदे आणि ठाकरे गटाच्या वकीलांनी जोरदार युक्तिवाद केल्याचं दिसून आलं होतं.

शिंदे-फडणवीस काँग्रेसला मोठा धक्का देण्याच्या तयारीत; दोन बडे नेते भाजप-सेनेच्या वाटेवर

अपात्र आमदार प्रकरणाची सलग सुनावणी पार पडली. विशेष म्हणजे हिवाळी अधिवेशनादरम्यानही सुनावणी सुरुच होती. अखेर सुनावणीच्या वेळापत्रकानूसार सुनावणी पार पडत नसल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला. या प्रकरणी ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात आपलं म्हणणं मांडलं होतं. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने राहुल नार्वेकरांना फटकारलं होतं. न्यायालयाने 31 डिसेंबर अखेरीस या प्रकरणाचा निकाल देण्याबाबत निर्देश दिले होतं.

नार्वेकरांनी सुनावणीतील साक्ष, दस्ताऐवज आणि पुराव्यांची तपासणी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा, अशी मागणी सर्वोच्च न्यायालयाकडे केली मात्र, सर्वोच्च न्यायालयाने नार्वेकरांना 10 जानेवारीपर्यंतच मुदत दिली होती. अखेर 10 जानेवारीला नार्वेकरांनी निकाल दिला आहे.

नार्वेकरांनी काय निकाल दिला?
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानूसार 10 जानेवारीला निकाल जाहीर केला. नार्वेकरांनी निकालामध्ये शिवसेना पक्षाच्या घटनेतील 2018 मध्ये करण्यात आलेले बदल मान्य केले नसून एकनाथ शिंदेंचीच शिवसेना खरी असल्याचं सांगितलं. तर व्हिप म्हणून भरत गोगावलेंची नियुक्ती वैध ठरवली आहे. तसेच दोन्ही गटाचे आमदार पात्र ठरवले आहेत.

दरम्यान, नार्वेकरांच्या निकालावर आक्षेप घेत सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करण्यात आल्याचा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. निकालानंतर आज ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात नार्वेकरांच्या निकालाला आव्हान देणारी याचिका दाखल करण्यात आली आहे. आता या याचिकेवर न्यायालयात सुनावणीदरम्यान, कोणत्या बाबी समोर येणार हे पुढील काळातच समजेल…

follow us