Download App

Kasba By Election : एका विजयाने हुरळून जाऊ नका, मुख्यमंत्र्यांचा महाविकास आघाडीला टोला

मुंबई : ‘पोटनिवडणुका या स्थानिक निवडणुका असतात त्यामुळे काही त्रुटी उणीवा राहिल्या असतील. त्या सुधारण्याचा आम्ही प्रयत्न करू. आमचे कार्यकर्ते यामुळे खचून जाणारे नाही. पण एका विजयाने विरोधकांनी देखील हूरळून जाऊ नये.’ असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी महाविकास आघाडीला लगावला आहे.

त्याचबरोबर ते असं देखील म्हटले की, कसबा (Kasba) पोटनिवडणुकीचा आनंद महविकास आघाडीला घेऊ द्या. आम्ही आमचं काम करतो. आमचं सरकार हे काम करणार सरकार आहे. पुढच्या निवडणुकीत बहुमतांनी विजयी होऊन येऊ. पोटनिवडणुका म्हणजे सार्वत्रिक निवडणुका नसतात. एका विजयाने मविआला हुरळून जायची गरज नाही.

जनादेशाचा स्वीकार करत फडणवीस म्हणाले, आम्ही पुन्हा येऊ!

कसबा मतदारसंघातील मतमोजणी पूर्ण झाली असून या मतदासंघात अखेर काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar)विजयी झाले आहेत. त्यांच्या विजयाने भाजपचा (BJP) हा बालेकिल्ला काँग्रेसने हिसकावून घेतला आहे. या निवडणुकीत धंगेकरांना एकूण 72 हजार 599 मते मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasne) यांना 61 हजार 771 मते मिळाली. धंगेकरांनी एकूण 11 हजार 40 मतांनी विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घोषित केले.

Tags

follow us