Download App

Video : गृहमंत्री अमित शाह यांच्याशी बंद दाराआड खलबत; शिंदेंनी पत्रकार परिषदेत काय सांगितलं?

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिल्लीचा दौरा करत पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.

  • Written By: Last Updated:

DCM Ekath Shinde Visits Delhi : दिल्लीत संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आलेला दिसून येत आहे. उद्धव ठाकरे यांचा नियोजित दिल्ली दौरा सुरू असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही (Shinde) दिल्लीत पोहोचले. आधी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची खासदारांच्या शिष्टमंडळासह भेट घेतली. त्यानंतर ते सहकुटुंब पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले. अमित शाहांबरोबर बैठक झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांळी संवाद साधला.

पहलगाम हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानला जशास तसे उत्तर दिल्याबाबत आपण पंतप्रधान मोदींना शुभेच्छा देण्यासाठी भेटलो असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. ते म्हणाले, आजवर पाकिस्तान आणि दहशतवाद्यांनी अनेक हल्ले केले. परंतु, यावेळी जशास तसं उत्तर देण्याचं धाडस पंतप्रधान मोदींनी दाखवलं. तसंच, जगभरात शिष्टमंडळ पाठवून पाकिस्तानचा खरा चेहरा उघड केला. त्यामुळे त्यांचं अभिनंदन करत आणि शुभेच्छा दिल्या.

उद्धव ठाकरे अन् एकनाथ शिंदे एकाच दिवशी दिल्ली दौऱ्यावर; टायमिंग अन् नव्या समिकरणाची चर्चा

उपराष्ट्रपतीपदासाठी पाठिंबा देण्याबाबतच्या विषयावर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, एनडीए आघाडीतील शिवसेना हा चौथ्या क्रमाकांचा पक्ष आहे. उपराष्ट्रपतीपदासाठी भाजपा आणि एनडीए जो निर्णय घेईल, त्याला आमचा पाठिंबा असेल. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी बंद दाराआड चर्चा झाली? याबद्दल प्रश्न विचारला असता एकनाथ शिंदे म्हणाले, आमचे बंद दाराआड काही नाही. आम्ही तिथे खासदारांसह गेलो होतो. त्यांचे विषय या बैठकीत मांडले. त्यांच्याशी राज्यातील विविध विषयांबाबत चर्चा केली.

विधानसभा निवडणुकीत शिवसेना (शिंदे) पक्षाने मविआच्या ज्या उमेदवारांचा पराभव केला, त्या उमेदवारांना भाजपा पक्षप्रवेश देत असून त्यांना ताकद देत आहे. यावरून महायुतीत आलबेल नाही, असा आरोप होत असल्याबाबतचाही प्रश्न शिंदे यांना विचारण्यात आला. यावर बोलताना शिंदे म्हणाले, आम्ही महायुतीची ताकद वाढविण्याचा प्रयत्न करत आहोत. आमच्यात कोणतीही धुसफूस नाही. दरम्यान, हे सगळ होत असलं तरी शिंदे यांच्या मनात नक्की काहीतरी सुरू आहे आणि राजकारणात मोठ काहीतरी घडणार आहे अशी चर्चा आता रंगली आहे.

follow us

संबंधित बातम्या