Download App

Eknath Shinde : ‘…तो मैं खुद की भी नही सुनता’ जेव्हा एकनाथ शिंदे सलमानची स्टाईल मारतात

CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याणमधील एका कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. त्यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित केलं. या भाषणामध्ये त्यांनी बॉलिवूडचा अभिनेता सलमान खानचा प्रसिद्ध डायलॉग मारत हशा पिकवला. शिंदे म्हणाले की, ‘तुम्हाला वाटलं मी या कार्यक्रमाला येईल की नाही पण एकनाथ शिंदे एक बार कमिटमेंट करता है, तो पुरी करता है और कमिटमेंट करने के बाद खुद की भी नही सुनता.’ यावेळी उपस्थितांनी हसत त्यांच्या या डायलॉगला दाद दिली.

यावेळी देखील त्यांनी पुन्हा एकदा आठ महिन्या पूर्वी आम्ही कार्यक्रम केला. असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लागवला. कल्याणमधील MCHI यांनी आयोजित केलेल्या प्रॉपर्टी एक्झिबिशन कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावली. त्यावेळी ते बोलत होते.

आमदार- खासदारासह मुख्यमंत्री शिंदे अयोध्या दौऱ्यावर

दरम्यान एकनाथ शिंदे हे आजपासून दोन दिवसीय अयोध्या दौऱ्यावर जाणार आहे. दौऱ्यादरम्यान ते प्रभू श्रीरामांचे दर्शन घेणार आहेत. नंतर शरयू नदीवर महाआरती करणार आहेत. तसेच अयोध्या दौऱ्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेणार आहेत. दरम्यान एकनाथ शिंदे यांचा दौरा हा राज्यातील राजकारणासाठी देखील महत्वाचा आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः अयोध्या दौऱ्याला जाणार असल्याने शिवसेनेचे कार्यकर्ते देखील तयारीला लागले आहे. शिवसेनेचे हजारो कार्यकर्ते आज ट्रेनने अयोध्येच्या दिशेला रवाना झाले आहेत. विशेष म्हणजे या शिवसैनिकांसाठी सरकारकडून ठाणे आणि नाशिक येथून सुटणाऱ्या दोन विशेष ट्रेनची सुविधा करण्यात आलेली. हे कार्यकर्ते आज अयोध्येला पोहोचणार आहेत.

Tags

follow us