Eknath Shinde on Udhhav Thackery for criticize Sharad Pawar : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांनी एकनाथ शिंदेंचा सत्कार केल्याच्या मुद्द्यावरून पवारांवर टीका केली आहे. त्यानंतर शिंदेंची शिवसेना देखील आक्रमक झाली. त्यात आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावरून ठाकरेंना पुन्हा एकदा फटकारले आहे. ते म्हणाले की, ज्यांनी तुम्हाला एकेकाळी मुख्यमंत्री केलं त्या शरद पवारांवर देखील टीका करता. जनाची नाहीतर मनाची तरी ठेवा.
WPL च्या उद्घाटन समारंभात देशभक्तीचा उत्साह, आयुष्मानची धमाकेदार परफॉर्मन्स
तुम्ही कीती शिव्या शाप देणार किती आरोप करणार मला दिल्लीत महापराक्रमी महदजी शिंदे यांच्या नावाचा राष्ट्रगौरव पुरस्कार मिळाला. तो मला शरद पवार यांनी दिला. त्यामुळे याचा स्रवाना अभिमान वाटला कारण एका मराठी माणसाने एका मराठी माणसाला हा पुरस्कार दिला. तिथे महदजी शिंदेंचे वंशज केंद्रिय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया हे उपस्थित होते. मात्र हे मला पुरस्कार दिला म्हणून महदजी शिंदेंचा साहित्यिकांचा अपमान करतात. तसेच ज्यांनी तुम्हाला एकेकाळी मुख्यमंत्री केलं त्या शरद पवारांवर देखील टीका करता. जनाची नाहीतर मनाची तरी ठेवा. असं म्हणत शिंदेंनी ठाकरेंना पुन्हा एकदा फटकारले आहे.
काय म्हणाले होते राऊत ?
एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्राचे सरकार पाडले, बेईमानी केली त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवारांनी जायला नको होते अशी आमची भावना आहे. आता राज्यातील जनतेसमोर आम्ही कोणत्या तोंडाने जाणार? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. राजकारणात कुणी कुणाचा शत्रू आणि कुणी कुणाचा कायमचा मित्र नसतो हे ठीक आहे. प ज्यांना आम्ही महाराष्ट्राचे शत्रू समजतो. ज्यांनी महाराष्ट्राची वाट लावली. त्यांच्याबरोबर जे लोक खुलेआमपणाने जाऊन बसलेत त्यांना अशा प्रकारचे सन्मान देणे म्हणजे राज्याच्या अस्मितेला आणि स्वाभिमानाला धक्का लावण्यासारखे आहे अशी टीका राऊत यांनी शरद पवार यांच्यावर केली.
न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेत मॅनेजरकडूनच गफला ! वेगवेगळ्या शाखेतून 122 कोटी रुपये हडपले
शरद पवारांनी एकनाथ शिंदेसारख्या गद्दाराचा केलेला सन्मान महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लावणारा आहे. दिल्लीत होणारे साहित्य संमेलन हे दलाल आणि भ्रष्टाचाऱ्यांचे संमेलन आहे, असा घणाघाती आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्यांच्या या वक्तव्यावरुन महाविकास आघाडीतच धुसफूस सुरू झाली आहे. शरद पवार गटातील नेत्यांनी जोरदार टीका केली.