न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेत मॅनेजरकडूनच गफला ! वेगवेगळ्या शाखेतून 122 कोटी रुपये हडपले

बँकेचे जनरल मॅनेजर व अकाउंट विभागाचे प्रमुख हितेश मेहता (Hitesh Mehta) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला

  • Written By: Published:
New India Co-operative Bank Scam FIR against Hitesh Mehta

New India Co-operative Bank Scam FIR against Hitesh Mehta: रिझर्व्ह बँकेने (RBI) मुंबईतील न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या
(New India Co-operative Bank Scam )कामकाजावर निर्धंब घातले आहे. त्यामुळे ठेवीदारांना बँकेतून रक्कम काढता येणार नाही. या प्रकरणी आता पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या प्रकरणी बँकेचे जनरल मॅनेजर व अकाउंट विभागाचे प्रमुख हितेश मेहता (Hitesh Mehta) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे. हितेश मेहता यांनी बँकेच्या दोन शाखांमधून तब्बल 122 कोटी रुपये काढले आहे. कोविडच्या काळात हा घोटाळा झाला आहे. या घोटाळ्यात मॅनेजर एकदाच आहे की दुसऱ्यांचाही सहभाग याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

‘बदनाम करण्याचं षडयंत्र… त्याचं नाव मी मुख्यमंत्र्यांना सांगणार’; सुरेश धसांनी दिला इशारा

हितेश हा अकाउंट विभागाचा प्रमुख होता. त्यामुळे त्याच्याकडे पैसे सांभाळण्याची जबाबदारी होती. त्याने प्रभादेवी शाखेतून 112 कोटी रुपये काढून घेतले होते. तर गोरेगाव शाखेतून दहा कोटी रुपये काढले आहे. या प्रकरणी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी देवर्षी घोष यांनी दादर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. या घोटाळा 2020 ते 2025 या काळात झाला आहे. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

महिलांशी गैरवर्तन केल्यास एसपींना टायरखाली घ्यायला सांगेन; अजित पवारांची कार्यकर्त्यांना तंबी


बँकेवर कोणते प्रतिबंध ?

या घोटाळ्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेवर प्रतिबंध लावण्यात आले आहे. त्यामुळे आता बँक नवीन कर्ज देऊ शकत नाही. रक्कम स्वीकारू शकत नाही. तसेच ठेवीदारांना ठेवी देता येणार नाही. तसेच संपत्तीची विक्री करू शकत नाही. हे प्रतिबंध तब्बल सहा महिने राहणार आहेत.

बँकेचे संचालक मंडळ बरखास्त

रिझर्व्ह बँकेने न्यू इंडिया बँकेचे संचालक मंडळ बरखास्त केले आहे. तसेच कामकाज पाहण्यासाठी प्रशासकाची नियुक्ती केली आहे. तसेच एक सल्लागार समितीची नियुक्ती केली जाणार आहे.

follow us