एकनाथ शिंदेंचा अयोध्या दौऱ्यात भरगच्च कार्यक्रम : योगींनीही घरी बोलविले….

Eknath Shinde : बऱ्याच दिवसांपासून चर्चेत असलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अयोध्या दौरा निश्चित झाला आहे. येत्या ८ एप्रिलला मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री, आमदार अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. शिंदे यांचा दोन दिवसांचा भरगच्च अयोध्या दौरा असून त्यांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही मुख्यमंत्री शिंदे यांना घरी येण्याचं निमंत्रण दिले आहे. Rohit Pawar : […]

Eknath Shinde Ayodhya 1

Eknath Shinde Ayodhya 1

Eknath Shinde : बऱ्याच दिवसांपासून चर्चेत असलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अयोध्या दौरा निश्चित झाला आहे. येत्या ८ एप्रिलला मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री, आमदार अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. शिंदे यांचा दोन दिवसांचा भरगच्च अयोध्या दौरा असून त्यांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही मुख्यमंत्री शिंदे यांना घरी येण्याचं निमंत्रण दिले आहे.

Rohit Pawar : ब्रिटीश राजवटीची आठवण करून देणारा हा धोकादायक कारभार – Letsupp

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ८, ९ आणि १० एप्रिल असा दौरा निश्चित करण्यात आला आहे. अयोध्या येथे राम मंदिरात ते महाआरती करणार आहे. त्यानंतर अयोध्यात होत असलेल्या भव्य राम मंदिराच्या कामाची पाहणी करणार आहे. त्यानंतर ते शरयू नदीच्या किनारी महाआरती करणार आहे.

मुख्यमंत्री शिंदे हे ८ एप्रिल सायंकाळी मुंबई विमानतळावरून लखनऊला रवाना होणार आहे. ९ एप्रिल सकाळी १० ते रात्री ११ वाजेपर्यंत त्यांच्या विविध कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. सकाळी १२ वाजता राम मंदिरात महाआरती करण्यात येणार आहे. त्यानंतर दीड वाजता भव्य राम मंदिराच्या कामाची पाहणी करणार असून दुपारी अडीच वाजता ते पत्रकार परिषद घेणार आहे. तर सायंकाळी ७ वाजता शरयू नदी किनारी महाआरती मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करणार आहेत.

Exit mobile version