Rohit Pawar : ब्रिटीश राजवटीची आठवण करून देणारा हा धोकादायक कारभार

Rohit Pawar : ब्रिटीश राजवटीची आठवण करून देणारा हा धोकादायक कारभार

मुंबई : नऊ महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी आपल्या 40 आमदारांना सोबत घेऊन शिवसेनेत बंड केलं. त्यामुळं महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आलं. त्यानंतर राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडल्या. एकनाथ शिंदे यांनी भापजसोबत जाऊन शिंदे-फडणवीस सरकार स्थापन केलं. त्यानंतर विरोधकांना शिंदे गटावर जोरदार टीका केली होती. 50 खोके, एकदम ओक्के… गद्दार अशा घोषण विरोधक देऊ लागल्या. त्यानंतर राम मुंगासे(Ram Mungase) या रॅपरने 50 खोके घेऊन चोर आले, चोर आले पाहा ओके होऊन असं रॅप रचलं होतं. राC यांचं रॅप सोशल मीडियावर जोरदार व्हायरलं झालं होतं. दरम्यान, आज राम मुंगासे याला छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी अटक केली. यावरून विरोधक आक्रमक झाले. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनीही या घटनेविषयी संताप व्यक्त केला.

50 खोके घेऊन चोर आले, चोर आले पाहा ओके हे रॅप तयार करून राज मुंगासे हा सोशल मीडियावर स्टार झाला होता. पण, दुसऱ्याच दिवशी पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. राम मुंगासे याच्या रॅपमध्ये चोर आले, चोर आले… एकदम ओके होऊन… कसे बघा चोरे आले, पन्नास खोके घेऊन… एकदम ओके होऊन…. अरे *** मिशीला ताव बघा, ह्यांनी पाठिवर दिला आपल्या घाव बघा, असे बोल या रॅपमध्ये होते. ह्या बोलवरून राम याला अटक केली. आता राम याच्या अटकेवरून रोहित पवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. रोहित पवार यांनी ट्विट करत लिहिलं की, आपल्या रॅप सॉंग मध्ये कुणाच्याही नावाचा उल्लेख नसतानाही राम मुंगासे या तरुण कलाकाराला 50 खोके या शब्दामुळे अटक होत असेल तर हा सरकारच कबुलीजबाबज नाही का? असा टोला त्यांनी लगावला.

वर्ल्ड टेस्ट चैंपियनशिप पूर्वी चेतेश्वर पुजाराकडे कर्णधारपद

रोहित पवार यांनी पुढं लिहिलं की, शिव्याचं कुणीही समर्थन करत नाही, पण राज्यातील खुद्द एका मंत्र्यानेच महिला लोकप्रतिनिधील अर्वाच्च शिवीगाळ केली, तेव्हा कारवाई करण्याऐवजी सरकारनेकोनात बोटं घातली आणि डोळे बंद केले. ब्रिटीश राजवटीची आठवण करून देणारा हा धोकादायक कारभार आहे, असं रोहित पवार म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube