Download App

वैभवीच्या शिक्षणाचा खर्च एकनाथ शिंदे करणार, योगेश कदम यांची माहिती

Eknath Shinde will pay for Vaibhavi Deshmukh Education Expenses : राज्य गृहमंत्री योगेश कदम यांनी आज मस्साजोगमध्ये (Beed) जावून दिवंगत सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे. भेटीदरम्यान त्यांनी संतोष देशमुख यांच्या हत्येच्या तपासावर देखील चर्चा केली. ज्यांच्यावर शंका आहे, त्या अधिकाऱ्यांना माफ करणार नाही, असं आश्वासन देखील योगेश कदम यांनी दिलंय. तर संतोष देशमुख यांना न्याय द्यायचा असेल तर आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, असं देखील योगेश कदम (Yogesh Kadam) म्हणाले आहेत.

शिंदे साहेबांचा (Eknath Shinde) या प्रकरणावर पूर्णपणे लक्ष आहे. आपल्या कुटुंबियांसोबत माननीय शिंदे साहेब आहेत. हा संदेश घेवूनच आज मी इथे आलो आहे. पोलीस प्रशासनाला ज्या सूचना द्यायच्या आहेत, त्या आम्ही दिलेल्याच (Beed News) आहेत. ज्या गोष्टी तुम्ही मला निर्दशनास आणून दिलेल्या आहेत. प्रशासन असेल किंवा मग ज्या काही बाहेर जी लोकं येत आहेत, दहशत पसरवणं असेल किंवा मग त्यांचं स्थलांतर करणं असेल, याबाबतीत मी आजच माझ्या स्तरावरचे आदेश दिलेले आहेत. परंतु ज्या गोष्टी मला देवेंद्र साहेब आणि शिंदे साहेब यांच्याशी चर्चा करणे गरजेचे आहे. त्या मी आजच्या आजच शिंदे साहेबांसोबत बोलून घेईल.

शेअर बाजारात ‘ब्लॅक फ्रायडे’…साडेनऊ लाख कोटी रुपयांचं नुकसान, मार्केट पडण्याचे प्रमुख 6 कारणे

योगेश कदम म्हणाले की, पहिली मागणी योग्य वाटते. त्यांचं स्थलांतर करणं आणि त्यांना इथून अन्य ठिकाणी ठेवणं. जेणेकरून त्यांचा प्रभाव देशमुख कुटुंबियांवर पडणार नाही. देशमुख कुटुंबाला घर बांधून देण्याचं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं होतं. तर त्याच पार्श्वभूमीवर पाहणी केल्याचं योगेश कदम यांनी सांगितलं आहे. तर घरभरणीसाठी एकनाथ शिंदे स्वत: उपस्थित राहतील, असं देखील योगेश कदम यांनी स्पष्ट केलंय.

70 कोटी…खोतकरांनी साखर कारखान्यावर दरोडा टाकला, अंजली दमानियांचे गंभीर आरोप

फक्त घरच नाही तर, संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख (Vaibhavi Deshmukh) हिच्या शिक्षणाचा खर्च देखील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार आहेत, असं देखील गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी स्पष्ट केलंय. पुढच्या पावसाच्या अगोदर देशमुख यांच्या घराचं बांधकाम पूर्ण होणार आहे. शिंदे साहेबांच्या आदेशाने आज मी इथे आलेलो आहे. ज्या कुटुंबावर इतकं मोठं संकट आलं, त्यांना राहण्यासाठी घर नाही. तेव्हाच शिंदे साहेबांनी पुढाकार घेतला. वैभवीच्या शिक्षणाचा खर्च ते स्वत: करणार आहेत. एकनाथ शिंदे देशमुख कुटुंबियांच्या पाठीमागे आहेत.

 

follow us