Parambir Singh : देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून दबाव टाकला जात होता, असा गौप्यस्फोट माजी आयपीएस अधिकारी परमबीर सिंह (Parambir Singh) यांनी केलायं. गुन्हे दाखल करणारे सुत्रधार अनिल देशमुख मात्र, त्यांच्यामागे शरद पवार, उद्धव ठाकरे असल्याचाही गौप्यस्फोट सिंह यांनी केलायं. दरम्यान, 100 कोटी रुपयांच्या वसुलीच्या आरोपांवरुन अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि परमबीर सिंह यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. अशातच आता सिंह यांनी गौप्यस्फोट केलायं. यामध्ये खुद्द शरद पवारांसह, उद्धव ठाकरे, अनिल देशमुख यांचीही नावे समोर आली आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडालीयं.
दोन वर्षात लाडकी बहिण आठवली नाही, पण लोकसभेनंतर…; पृथ्वीराज चव्हाणांचा अजितदादांना टोला
परमबीर सिंह म्हणाले, पक्षाकडून वसुलीचं टार्गेट असल्याचं कारण देत बेकायदेशीर वसुली करण्यासाठी माझ्यावर दबाव टाकण्यात येत होता. वसुली हाच महाविकास आघाडीच्या नेत्यांचा मुख्य स्त्रोत होता. तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, अनिल देशमुख, माजी आमदार अनिल घोटे, प्रविण चव्हाण यांची सिल्वर ओकवर बैठक पार पडली. या बैठकीत गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर गुन्हे दाखल करण्याबाबत मला सांगण्यात आलं होतं. मात्र, मी सांगितलं की हा गुन्हा नाही, मी गुन्हा दाखल करु शकत नाही, असं परमबीर सिंह यांनी सांगितलंय.
धक्कादायक, गुजरातमधील शिक्षिका 8 वर्षांपासून अमेरिकेत अन् दरमहा खात्यात जमा होतो सरकारी पगार
तसेच गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर कोणता गुन्हा दाखल करण्याबाबतचा सवाल करण्यात आल्यानंतर सिंह यांनी उत्तर दिलं नाही. याबाबत मी माझ्या डायऱ्यांमध्ये पाहुन तुम्हाला सांगू शकतो, असं परमबीर सिंह यांनी सांगितलं आहे. तर अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांची वसुली होण्यासंदर्भातील आरोप खरे असल्याचं परमबीर सिंह यांनी स्पष्ट केलंय. अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात बॉलिवूडवर दबाव टाकण्याबाबतही दबाव टाक असल्याचा आरोप परमबीर सिंह यांनी केलायं.
दरम्यान, चांदिवाल कमिशनचा रिपोर्ट सबमिट झाला तेव्हा महाविकासआघाडीचे सरकार होते त्यात काय आहे हे त्यांना जास्त माहीत असेल. माझ्याकडे व्हिडीओ पुरावे आहेत. गरज भासल्यास योग्य वेळी समोर आणेन. हे प्रकरण अनिल देशमुखांपुरते मर्यादित नव्हते त्याचे कनेक्शन मातोश्रीपर्यंत आहेत. योग्य वेळी सत्य समोर येईल, असं परमबीर सिंह म्हणाले आहेत.