परमबीर सिंह यांचं अनिल देशमुखांना खुलं आव्हान, म्हणाले, नार्को टेस्ट करु..,

परमबीर सिंह यांचं अनिल देशमुखांना खुलं आव्हान, म्हणाले, नार्को टेस्ट करु..,

Parambir Singh : आपण दोघांचीही नार्को टेस्ट करु, असं खुलं आव्हानच माजी आयपीएस अधिकारी परमबीर सिंह (Parambir Singh) यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना दिलंय. दरम्यान, शंभर कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणी अनिल देशमुख यांनी माजी पोलिस अधिकारी परमबीर सिंह यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या आरोपांनतर आज सिंह यांनी एका वृत्तवाहिनीशी फोन कॉलद्वारे संवाद साधून अनिल देशमुखांना खुलं आव्हानच दिलंय.

राजकीय निवृत्तीची घोषणा प्रकाश सोळंकेंची अन् चर्चा सुरू झाली शरद पवारांची; काय आहे कनेक्शन?

सिंह म्हणाले, अनिल देशमुख यांनीच वसुलीचे आदेश दिले होते. सध्या ते आरोप करीत आहेत, त्यावरुन असं वाटतंय की देशमुखांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. ज्यावेळी आरोप झाले तेव्हा अनिल देशमुख यांचा मुलगा सलील देशमुख याने माझी भेट घेत केस मागे घेण्यासाठी माझ्या हातापाया पडला, मला विनंती केली असल्याचं परमबीर सिंह यांनी स्पष्ट केलंय.

कमल हसन यांचा फ्लॉप चित्रपट ‘इंडियन 2’ आता ओटीटी होणार प्रदर्शित; कधी, कुठे जाणून घ्या…

अनिल देशमुखांवर आरोप केल्यानंतर संजय पांडे यांच्याकडून मला धमकावण्यात आलं होतं. अनिल देशमुख यांच्याविरोधातील केस मागे घेण्याबाबतचं सांगण्यात आलं होतं. यासंदर्भातील रेकॉर्डिंग मी सीबीआय, न्यायालयात दिलेले आहे. मला टार्गेट केलं जात होतं. मी केस काढली नाही तर माझ्याविरोधात खोटे गुन्हे दाखल करणार असल्याचं देशमुखांकडून सांगण्यात आलं होतं, पण मी न घाबरता प्रकरणाचा पूर्ण तपास केला होता. माझ्याविरोधात खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी अनिल देशमुख यांच्या घरी संजय पांडेंसह इतर गुन्हेगारांची बैठक झाली होती. या बैठकीत अनिल देशमुख यांनी त्यांना सूचना दिल्या होत्या. याबाबत खोटं असेल तर अनिल देशमुख, सलील देशमुख, संजय पांडे यांच्यास माझी नार्को टेस्ट करावी, असं परमबीर सिंह म्हणाले आहेत.

, मी सत्य माहिती दिली नाही तर माझ्यावर कारवाई का केली नाही? अनिल देशमुख यांनी जे आरोप केले आहेत, त्यासंदर्भात त्यांनी त्यावेळी माझी चौकशी का केली नाही? माझ्यावर कारवाई का केली नाही? माझी तीन वेळा एनआयएकडे चौकशी झाली. त्या चौकशीत काहीच आढळले नसल्याचं सिंह यांनी स्पष्ट केलंय.

अनिल देशमुखांनी काय आरोप केले?
अंबानी यांच्या घरासमोर स्कॉर्पिओ गाडीमध्ये बॉम्ब प्रकरणाचा मास्टरमाईंड परमबीर सिंह असून या प्रकरणातून वाचण्यासाठी सिंह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात डील झाली होती. या बदल्यात परमबीर सिंह यांना माझ्यावर आरोप करण्याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी सिंह यांना सांगितलं असल्याचा आरोप अनिल देशमुख यांनी केला आहे.

झूठ बोले कव्वा काटे, काले कव्वे से डरियो…
अनिल देशमुख यांनी या प्रकरणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही आरोप केल्यानंतर फडणवीस यांनी या आरोपावर प्रत्युत्तर दिलंय. आज सकाळी त्यांना माध्यमांकडून अनिल देशमुखांच्या आरोपांवर विचारण्यात आल्यानंतर “झूठ बोले कव्वा काटे, काले कव्वे से डरियो” असं एका वाक्यातच प्रत्युत्तर दिलं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube