Download App

‘हॉटेलमध्ये रेस्टॉरंट अन् कसिनो एकाच..,’; व्हायरल फोटोवर बावनकुळेंची सारवासारव

Chandrashekhar Bawankule : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे(Chandrashekhar Bawankule) यांचा कसिनो खेळतानाचा कथित फोटो सध्या समाजमाध्यमांवर तुफान व्हायरल होत आहे. बावनकुळेंच्या याच कथित फोटोवर बोट ठेवत विरोधी पक्षाच्या नेत्यांनी चंद्रशेखर बावनकुळेंना चांगलाच घेरा घातल्याचं दिसून येत आहे. चंद्रशेखऱ बावनकुळेंच्या या फोटोची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगलीयं. अशातच या व्हायरल फोटोवर खुद्द चंद्रशेखर बावनकुळेंनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. यासंदर्भातील बावनकुळेंनी एक्सवर पोस्ट केली आहे.

बावनकुळे पोस्टमध्ये म्हणाले, “मी मकाऊ येथे ज्या हॉटेलमध्ये सहकुटुंब मुक्कामी होतो, तेथील हा परिसर आहे. या हॉटेलच्या ग्राऊंड फ्लोअरवर रेस्टॉरंट आणि कसिनो एकच आहे. जेवण केल्यानंतर मी कुटुंबीयांसह रेस्टॉरंटमध्ये बसलो असताना कुणीतरी काढलेला हा फोटो आहे,” या शब्दांत आता चंद्रशेखर बावनकुळेंनी सारवासारव केली आहे.

चंद्रशेखर बावनकुळे आपल्या कुटुंबियांसोबत मकाऊ दौऱ्यावर आहेत. याचदरम्यान बावनकुळे कुटुंबासोबत हॉटेलमध्ये जेवण्यासाठी गेले. मात्र, हॉटेलच्या ग्राऊंड प्लोअरवर रेस्टॉरंट आणि कसिनो एकच असल्याचं बावनकुळेचं म्हणणं आहे. याचवेळी रेस्टॉरंटध्ये आम्ही जेवण केल्यानंतर बसलेलो असतानाच कोणीतरी फोटो काढल्याचं स्पष्टीकरण बावनकुळेंनी आता दिलंय.

Sujay Vikhe यांच्याकडून लोकसभा, विधानसभेची पायाभरणी; विकास कामांसाठी कोट्यवधींचा निधी

बावनकुळे यांचा हा कथित व्हिडिओ समाजमाध्यमांवर तुफान व्हायरल होत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळातून भाजपसह चंद्रशेखर बावनकुळेंवर जोरदार टीका केली जात असल्याचं पाहायला मिळतं आहे. महाराष्ट्र काँग्रेसने एक्सवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं, “दिवाळी स्पर्धा! एका पत्याच्या pack मध्ये किती पत्ते असतात? अचूक उत्तर देणार्‍यांना Macau trip भेट.” या कॅप्शनसह चंद्रशेखर बावनकुळे यांचा कसिनो खेळतानाचा कथित फोटो शेअर केला आहे. या फोटोवरुन विरोधकांनी बावनकुळेंवर एकच हल्लाबोल चढवला आहे.

पैसे आले कुठून? नाना पटोलेंचा सवाल
महाराष्ट्रातील शेतकरी संकटात आहे, तरुण बेरोजगारीने त्रस्त आहे, महागाईने जनतेला जगणे कठीण झाले आहे पण सत्ताधारी भाजपाला त्याचे काहीही देणेघेणे नाही. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे मकाऊ येथे जुगार खेळत असल्याचे फोटो मीडिया व सोशल मीडियात दिसत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बावनकुळे जुगार खेळत असल्याचा फोटो ट्वीट केला आहे, हा फोटो खरा आहे का? बावनकुळे जुगार खेळत होते का? आणि जुगार खेळण्यासाठी बावनकुळे यांच्याकडे कोट्यवधी रुपये आले कोठून? याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

Maratha Reservation च्या विरोधात बोलला तर मी वाजवणारचं; जरांगे पाटलांची खुलेआम धमकी!

टेबलावर मारुती स्त्रोत आहे कायं? राऊतांनीही घेतला समाचार
19 नोव्हेंबर मध्यरात्री मुक्काम पोस्ट मकाऊ,veneshine. साधारण 3.50 कोटी कॅसिनो जुगारात उडवले असे प्रत्यक्ष दर्शी सांगतात. हिंदुत्ववादी असल्याने महाशय द्युत खेळले तर बिघडले कोठे? ते तेच आहेत ना? ते म्हणतात फॅमिलीसह मकाऊला गेले आहेत. त्यांच्या सोबत बसलेली फॅमिली चिनी आहे का? ते म्हणतात कधीच जुगार खेळले नाहीत. मग ते नक्की काय करत आहेत? त्यांच्या टेबलावर मारुती स्तोत्र आहे का? जेवढे खुलासे कराल तेवढे फसाल, झाला तेवढा तमाशा पुरेसा असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, चंद्रशेखर बावनकुळे यांचा जुगार खेळतानाचा कथित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजपकडू प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. चंद्रशेखर बावनकुळे कधीच जुगार खेळत नसल्याचं स्पष्टीकरण भाजपकडून देण्यात आलं तर जेवण केल्यानंतर बसलो असताना कुणीतरी फोटो काढल्याचं बावनकुळे म्हणाले आहेत.

Tags

follow us