Download App

कांदा निर्यातबंदी का उठली नाही? दिल्लीची हॉटलाइन वापरणाऱ्या विखे पिता-पुत्रांना राम शिंदेंचे चिमटे

  • Written By: Last Updated:

Ram Shinde speak on Radhakrishna Vikhe and Sujay Vikhe : अहमदनगरः भाजपचे विधानपरिषदेचे आमदार प्रा. राम शिंदे (Ram Shinde) हे विखे पिता-पुत्रांना डिवचण्याची एकही संधी सोडत नाहीत. कांदा निर्यातबंदीच्या प्रश्नावर आमदार राम शिंदेंना विखेंना चिमटे काढले आहेत. भाजपचे नेते व गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना दोन वेळेला कांद्याच्या प्रश्नासंदर्भात भेटण्याची वेळ का येते? खरे तर त्यावर चर्चा झाली की नाही, असा टोला आमदार राम शिंदे यांनी विखे पिता-पुत्रावर लगावला आहे. तर दुसरीकडे आमदार रोहित पवारांवर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करतो, असे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे (>Radhakrishna Vikhe ) सांगतात मग त्यांनी तो का केला नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

‘मनोज जरांगेंचा रिमोट शरद पवारांच्या हाती’; जरांगेंच्या महिला सहकाऱ्याचा गौप्यस्फोट

जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या अध्यक्षतेखाली टंचाई आढावा बैठक झाली. या बैठकीला आमदार राम शिंदे हेही उपस्थित होते. बैठकीनंतर आमदार राम शिंदे हे शासकीय विश्रामगृह येथे गेले . तेथे माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी प्रामुख्यांने विखे यांच्यावर कांदा निर्यात बंदीवरुन निशाणा साधला.

उंटावर चक्कर मारताना डाव उलटला; नेमकं काय घडलं? थरकाप उडविणारा व्हिडिओ व्हायरल

आमदार राम शिंदे म्हणाले, देशाचे नेते मंत्री अमित शहा यांच्याशी मंत्री राधाकृष्ण विखे व खासदार सुजय विखे यांनी भेट घेतली. कांदा निर्यातबंदी उठवण्यावर चर्चा झाली की नाही, याबाबत शंका आहे . तसेच जर यावर चर्चा झाली तर बंदी का उठली नाही, असा प्रश्न माझ्या मनात निर्माण होतो. मग तुम्ही नेमकी कोणत्या प्रश्नाबाबत चर्चा केली. आठ दिवसांमध्ये दोनदा कोणता, असा प्रश्न होता की त्यावर चर्चा झाली, असा टोला त्यांनी लगावला.

राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी ज्यावेळेला आमदार रोहित पवार यांनी तलाठी भरती प्रक्रियेमध्ये घोटाळा झाला, असे सांगितले. त्यासंदर्भामध्ये मंत्री विखे यांनी मी त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहे, असे ते म्हणाले होते. मग त्यांनी जाहीर केले होते तर, त्यांनी दावा का दाखल केला नाही, असे आमदार शिंदे म्हणाले.

विखे व शिंदे एकाच पक्षात असले तरी दोघांमध्ये सख्य नाही. त्यात राम शिंदे हे विखेंविरोधात बोलण्याची कोणतीही संधी सोडत नाहीत. लोकसभेसाठी राम शिंदे हेही इच्छूक आहे. त्यांनी तसे जाहीरपणे सांगितले आहे. तर राम शिंदे हे विखेविरोधक आमदार निलेश लंके यांना भेटत आहे. राम शिंदे हे थेट विखेंविरोधात बोलत असले तरी विखे पिता-पुत्र मात्र थेटपणे बोलत नाहीत.

follow us