Download App

तेढ निर्माण करण्यासाठी रचलेला कट, उमेदवारीचे बनावट पत्र व्हायरल होताच भाजप आक्रमक

  • Written By: Last Updated:

Loksabha Election 2024 : महायुतीच्या (Mahayuti) जागावाटपाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. पालघर लोकसभेच्य जागेसाठी भाजप (BJP) आणि शिवसेना (Shivsena) यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. अशातच भाजपकडून प्रकाश कृष्णा निकम (Prakash Krushna Nikam) यांना उमेदवारी जाहीर करणारे पत्र सोशल मीडियावर व्हायरलं झालं आहे. यावर आता भाजपकडून भाष्य करण्यात आलं.

‘कचा-कच बटना’वरुन नवा वाद; ‘अजित पवार व्यापारीच’ विरोधक बरसताच दादांचं स्पष्टीकरण, म्हणाले.. 

भाजपकडून प्रकाश कृष्णा निकम यांना उमेदवारी दिल्याबाबतचे भाजपा केंद्रीय कार्यालयाचे खोटे पत्र प्रसारित केल्याबद्दल प्रदेश भाजपने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार पोलिसांनी तपास सुरू केला आहे. भारतीय जनता पार्टीच्या आचार संहिता व काय़दा विभागाचे प्रदेश अध्यक्ष ॲड. अखिलेश चौबे यांनी ही माहिती बुधवारी भाजपच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

‘कचा-कच बटना’वरुन नवा वाद; ‘अजित पवार व्यापारीच’ विरोधक बरसताच दादांचं स्पष्टीकरण, म्हणाले.. 

भाजपच्या खोट्या लेटरहेडवर व्हायरल करण्यात आलेले हे पत्र म्हणजे दोन पक्षांत तेढ निर्माण करण्यासाठी रचलेला कट आहे. याप्रकरणी अज्ञात इसमाविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ४२०, ४६७, ४६८ आणि ४१७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याचं चौबे म्हणाले. प्रदेश भाजप कायदा सेलचे निमंत्रक ॲड. शाहजी शिंदे, प्रदेश प्रवक्ते ओमप्रकाश चौहान हे देखील यावेळी उपस्थित होते.

पुढे बोलताना चौबे म्हणाले की, पालघर मतदारसंघासाठी प्रकाश निकम यांना भाजपकडून उमेदवारीचे दिल्याचं पक्षाच्या केंद्रीय कार्यालयाचे बनावट पत्र सोशल मीडियातून प्रसारित झाल्याचे समजल्यानंतर आपण मंगळवारी रात्री उशिरा मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. भाजपच्या बनावट लेटरहेडवर शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश कृष्णा निकम यांना उमेदवारी दिल्याचं पत्र प्रसिध्द करून भापज-सेना या दोन्ही पक्षात तेढ निर्माण करण्याचा हा कट असून त्याची चौकशी करण्याची मागणी चौबी यांनी केली.

पालघर लोकसभा जागेसाठी अद्याप महायुतीचा उमेदवार ठरलेला नसताना जाणूनबुजून खोटे पत्र व्हायरल करून महायुतीच्या भाजपा आणि शिवसेना या दोन पक्षांमध्ये नाहक तेढ निर्माण करण्याचा केलेला हा प्रयत्न हाणून पाडू, असेही चौबे म्हणाले.

 

follow us