Faltan Doctor Case : फडणवीससाहेब, कोणालाही क्लिनचीट देऊ नका, सुप्रिया सुळेंची हात जोडून विनंती…

फलटण महिला डॉक्टर प्रकरणी कोणालाही क्लिनचीट देऊ नका, अशी हात जोडून विनंतीच खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलीयं.

Sssss

Sssss

Faltan Doctor Case : देवेंद्र फडणवीससाहेब कोणालाही क्लिनचीट देऊ नका, अशी विनंतीच खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्याकडे केलीयं. फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी आज सुप्रिया सुळे यांनी मुंडे कुटुंबियांची बीडमध्ये जाऊन भेट घेतली. या भेटीमध्ये सुळे यांनी कुटुंबियांचं सांत्वन केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधलायं. यावेळी त्या बोलत होत्या.

विश्वविजेते होताच भारतीय संघावर होणार पैशांचा वर्षाव; बीसीसीआय देणार कोटींचे बक्षीस

पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, राजकारण बाजूला ठेऊन मुलीला न्याय मिळाला पाहिजे. पीडीत मुलीला न्याय मिळालाच पाहिजे. फलटण आत्महत्या प्रकरणात एसआयटीची स्थापना करावी, फलटण प्रकरणात सरकार असंवेदनशील असून या प्रकरणाची पारदर्शकपणे चौकशी झाली पाहिजे, दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे, या प्रकरणात कोणालाही क्लिनचीट देऊ नका, अशी विनंतीच सुळे यांनी फडणवीस यांच्याकडे हात जोडून केलीयं.

तसेच महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषदेतून महिला डॉक्टरप्रकरणी विधान केल्यानंतर त्याचाही समाचार सुळे यांनी घेतलायं. या प्रकरणी महिला डॉक्टरचे सीडीआर रिपोर्ट लिक झालाच कसा? असा थेट सवाल सुळे यांनी सरकारला केलायं. काही निवडक लोकांनाच सीडीआर रिपोर्ट मिळाला आहे. त्यावरुन आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. या प्रकरणी आम्ही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याचाही शब्द सुप्रिया सुळे यांनी पीडित कुटुंबियांना दिला आहे.

केरळच्या डाव्या सरकारला मोठ यश! ‘अत्यंत गरिबी’ दूर करणारे ठरले देशातील पहिले राज्य, मुख्यमंत्र्यांची घोषणा

महिला डॉक्टर महाराष्ट्राची लेक..गलिच्छ राजकारण कुठून सुरु झालं…
फलटणमधील महिला डॉक्टर ही महाराष्ट्राची लेक होती. तिचे सीडीआर रिपोर्ट काही निवडक लोकांनाच मिळाले आहेत. तिच्या सीडीआ रिपोर्टबाबत पत्रकार परिषदेत सांगण्यात आलंय. अहो ती कोणाची तरी लेक आहे, आणि तुम्ही असं करता हे गलिच्छ राजकारण कुठून सुरु झालंय, या प्रकरणाची पारदर्शकपणे चौकशी होऊ द्या, आम्ही कोणताही राजकीय दबाव येऊ देणार नसल्याचंही सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केलंय.

लागणार लॉटरी अन् मिळणार कोट्यवधींचं बक्षीस; ICC महिला क्रिकेट विश्वचषक 2025 बक्षीस रक्कम जाहीर

दरम्यान, आज आम्ही पीडित कुटुंबियांचं सांत्वन केलं असून माणुसकीच्या नात्याने आम्ही पीडित कुटुंबियांना भेटण्यासाठी आलो आहोत. आमची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे, की तुम्ही कोणालाही क्लिनचीट देऊ नका, आमचा तुमच्यावर विश्वास असल्याचंही सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलंय.

Exit mobile version