Ravindra Dhangekar Joins Shiv Sena Eknath Shinde Group : कॉंग्रेस (Congress) नेते रवींद्र धंगेकर यांनी (Ravindra Dhangekar) आज हातात धनुष्यबाण घेतला आहे. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. गेकर यांच्यासह त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी देखील शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडलाय. एकनाथ शिंदेंसोबत (Eknath Shinde) गेल्यानंतर रवींद्र धंगेकर यांची पहिलीच प्रतिक्रिया समोर आलाय.
शिवसेना प्रवेशानंतर रवींद्र धंगेकर म्हणाले की, मी दहा वर्ष शिवसेनेचा नगरसेवक म्हणून काम (Pune Politics) केलंय. यापूर्वी एकत्र परिवार म्हणून मी काम केलेलं आहे. आज पुन्हा परिवारामध्ये काम करण्याची संधी (Ravindra Dhangekar Joins Shiv Sena) मिळाली. आपल्या जुन्या सहकाऱ्यांसोबत पुन्हा काम करण्याचा प्रवास सामंत साहेबांनी इथपर्यंत आणलेला आहे. त्यासाठी त्यांचे आभार.
मंत्री जयकुमार गोरेंचे कारनामे चव्हाट्यावर आणले, पत्रकार तुषार खरात यांना अटक
कुटुंबातील सदस्य पुन्हा कुटुंबात आणण्यासाठी सामंत साहेबांनी किती काम केले, हे माझ्या दोन-तीन महिन्यात लक्षात आलं. महाराष्ट्रात घराघरात भांडण झालं तर त्यांनाच घेऊन गेलं पाहिजे, कारण त्यांना जुळवाजुळवी चांगली जमते. शिंदे साहेब जसं कॉमन मॅन आहेत, सर्वसामान्य माणूस त्यांना भेटू शकतो. तसेच त्यांच्या पावलावर पाऊल टाकून काम करण्याचा प्रयत्न करेल, असं आश्वासन रवींद्र धंगेकर यांनी व्यक्त केलंय.
आपण जो आदेश देताल, त्याप्रमाणे शिवसेनेचं नाव कधी कमी होणार नाही, असं काम करू असा शब्द देखील रवींद्र धंगेकर यांनी एकनाथ शिंदे यांना दिलाय. मला अनेकजण म्हणतात, तुम्ही आक्रमक चेहरा आहात. शिंदे साहेब पण आक्रमक चेहरा आहेत, जिथे चूक असेल तिथे शिंदे साहेब सत्ता बित्ता बाजूला ठेवतील. जिथे चूक आहे, तिथं बोलावं लागेल असं मी शिंदे साहेबांच्या कानावर घातल्यावर ते अडवणार नाही. कारण त्यांच मूळ हे शिवसेना आहे. शिंदे साहेबांपर्यंत पोहोचण्यासाठी बाकीच्या पक्षांचे बरेच अडथळे आले, पण आम्ही मनापासून तुमच्यापर्यंत पोहोचलो असं देखील धंगेकर म्हणाले आहेत.
2023 च्या कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये रवींद्र धंगेकर यांनी आमदार हेमंत रासने यांचा पराभव केला होता. त्यानंतर धंगेकरांची संपूर्ण राज्यभरात चर्चा झाली होती. मात्र, मागील वर्षी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये धंगेकर यांचा पराभव झाला होता. त्यानंतर आता पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार अन् काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर यांनी आज एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केलाय.