बीड जिल्ह्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का; जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावरच माजी आमदाराने साथ सोडली

या पक्षप्रवेशावेळी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट हेदेखील उपस्थित होते. शिरसाटांनी ठोंबेर यांचे अभिनंदन केले

News Photo   2026 01 18T183206.482

बीड जिल्ह्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का; माजी आमदाराने केला शिंदे सेनेत प्रवेश

राज्यभरात महानगरपालिका निवडणुकीत धूळधाण (Beed) उडालेली असताना आता पुन्हा धक्क्यावर धक्के राष्ट्रवादी(शरद पवार) गटाला बसताना दिसत आहेत. बीडमध्ये शरद पवार गटाच्या प्रदेश उपाध्यक्ष आणि केज विधानसभेच्या माजी आमदार संगीता ठोंबरे यांनी आपल्या समर्थकांसह आज रविवार (दि.18) शिवसेना पक्षप्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदेसेनेत जाहीर प्रवेश केला.

या पक्षप्रवेशावेळी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट हेदेखील उपस्थित होते. शिरसाटांनी ठोंबेर यांचे अभिनंदन केले व केज विधानसभेमध्ये शिवसेना पक्षाला बळकटी मिळेल, अशी आशा व्यक्त केली. यावेळी शिवसेना बीड जिल्हाप्रमुख सचिन मुळुक, शिवसेना नेते अनिल जगताप, माजी आमदार ज्ञानराज चौगुले, धाराशिव विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना नेते अजित पिंगळे यांच्यासह शिवसेनेचे नेते व पदाधिकारी हजर होते.

बीडमध्ये मोठी कारवाई! डॉक्टरांना एमडी ॲडमिशनचं आमिष, कोट्यवधींचा गंडा

आमदार ठोंबरे यांच्यासोबत डॉ. विजयप्रकाश ठोंबरे, कुंभेफळचे माजी सरपंच किशोर थोरात, भगवान सेनेचे संस्थापक अध्यक्ष विजय केंद्रे, अशोक सक्राते , अरविंद चाळक, उमेश चाळक यांच्यासह केज मतदार संघातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.

2014 मध्ये भाजपा तर्फे केज विधान सभेच्या आमदार राहिलेल्या संगीता ठोंबरे यांना 2019 च्या निवडणुकीत भाजपाने उमेदवारी नाकारून नमिता मुंदडा यांना दिली. त्यानंतर आमदार होण्यासाठी त्यांनी नोव्हेंबर 2024 मध्ये खासदार बजरंग सोनवणे यांच्या मध्यस्तीने राष्ट्रवादी(शरद पवार) पक्षात प्रवेश केला होता. मात्र, यावेळीही त्यांचा अपेक्षाभंग झाला. परंतु, आता आगामी जि.प. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शिंदेसेनेत प्रवेश केल्याची चर्चा आहे.

Exit mobile version