Download App

नांदेडमध्ये भाजपला मोठा धक्का, माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांचा राजीनामा

माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील (Suryakanta Patil) यांनी अखेर भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला

  • Written By: Last Updated:

Suryakanta Patil : लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचं आत्मचिंतन सुरू असतानाच नांदेडमध्ये भाजपला (BJP) मोठा धक्का बसला. गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेल्या माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटी (Suryakanta Patil) यांनी अखेर भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. विधानसभा निवडणुका तोंडावर असतानाच त्यांनी राजीनामा दिल्यानं राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

अभिनेता सुशांत शेलार पुन्हा चर्चेत, पडद्यामागच्या कलाकारांसाठी दिली मोठी भेट 

सूर्यकांता पाटील यांनी 2014 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी हदगाव मतदारसंघातून भाजपकडे विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती, मात्र त्यांना संधी मिळाली नाही. पुढं माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि डॉ. अजित गोपछडे यांना राज्यसभेत घेतल्याने त्या नाराज होत्या. दिल्लीत सुरू असलेले शेतकरी आंदोलन, अशोक चव्हाण यांचा भाजप पक्षप्रवेशावरून त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली.

सुजय विखेंचे अराजकीय इनिंग सुरू; जनतेच्या सेवेसाठी डॉक्टरकीची ओपीडी 

हिंगोली लोकसभा निवडणुकीसाठी सूर्यकांत पाटील यांनी भाजपकडे तिकीट मागितले होते. मात्र ती जागा शिवसेनेच्या शिंदे गटाकडे असल्याने त्यांना तिकीट मिळाले नाही. त्यामुळं त्यांनी सोशल मीडियावर जाहीरपणे नाराजीही व्यक्त केली होती. आयुष्यातील शेवटची निवडणूक लढवायची राहिली, अशी खंत त्यांनी बोलून दाखवली होती. वेळोवेळी डावलण्यात आल्याने त्या नाराज होत्याच, अखेर आज त्यांनी आपला राजीनामा पक्षाकडे सुपूर्द केला आहे.

गेल्या 10 वर्षात आपल्याला खूप काही शिकायलं मिळालं असून मी पक्षाची आभारी आहे. आता मी आपला निरोप घेतो, असे म्हणत सूर्यकांता पाटील यांनी पक्षाचा राजीनामा दिला. त्या काँग्रेस किंवा राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

सूर्यकांता पाटील यांनी चार वेळा खासदार, एक वेळआ आमदार म्हणून हिंगोली-नांदेड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेलं आहे. त्या ग्रामीण विकास मंत्रालयात राज्यमंत्री होत्या. यानंतर त्यांनी संसदीय कामकाज मंत्रालयाचे राज्यमंत्रीपदही भूषवले होते. सूर्यकांता पाटील पहिल्यांदा 1980 मध्ये हदगाव मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. 1986 मध्ये सूर्यकांता पाटील काँग्रेसमधून राज्यसभेवर गेल्या. 1991, 1998 आणि 2004 मध्ये त्या तीनदा लोकसभेवर निवडून गेल्या.

follow us