सुजय विखेंचे अराजकीय इनिंग सुरू; जनतेच्या सेवेसाठी डॉक्टरकीची ओपीडी
अहमदनगर : नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीत भाजपच्या (BJP) सुजय विखेंचा (Sujay Vikhe) पराभव झाला. झाला त्यानंतरही जनतेच्या सेवेसाठी डॉ. सुजय विखे पाटील यांनी आपली ओपीडी सुरूच ठेवली आहे. नगरकर आपल्या समस्या घेऊन विखे यांच्या दरबारी येत आहेत. आजही मोठ्या संख्येने नागरिक त्यांच्या समस्या घेऊन विखेंकडे आले होते. यावेळी जनतेच्या समस्या ऐकून घेत डॉ. सुजय विखेंनी त्या सोडल्या.
ओबीसी आंदोलन स्थगित, पंकजा मुंडे म्हणाल्या, माघार घेण्याचा प्रश्नच नाही!
नुकत्याच देशात लोकसभा निवडणुका या पार पडल्या. या निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल लागले. अनेक मातब्बर नेत्यांचा या निवडणुकीत पराभव झाला होता. महाराष्ट्रातील अत्यंत चर्चेत असलेले नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुतीकडून सुजय विखे उभे होते. तर यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके मैदानात होते. यामध्ये विखे यांना पराभवाला सामोरे जावे लागलं. निवडणुकीतील पराभवानंतरही डॉक्टर सुजय विखे यांनी नगरकरांच्या प्रति असलेले आपले कर्तव्य तसेच त्यांच्या अडचणी दूर करण्याचे काम सुरूच ठेवले.
मराठे आधी कोणाच्या अंगावर जाणार नाहीत, पण आता…; जरागेंचा थेट इशारा
नगर अर्बन हेल्थ येथे सुजय विखे आले असता मोठ्या संख्येने समस्याग्रस्त नागरिक त्या ठिकाणी जमा झाले. यावेळी नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्यांच्याशी संवाद साधत विखे यांनी त्या समस्या सोडविण्यासाठी संबंधितांना आश्वासित केले. तसेच यावेळी फोनद्वारे देखील त्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. जनतेच्या सेवेसाठी विखे कुटुंबीय कायम कटीबद्ध आहे असं आश्वासन निवडणुकीपूर्वीच सुजय विखे यांनी दिले होतं. जनतेला दिलेलं आश्वासन सुजय विखे पार पाडतांना दिसत आहेत.
दरम्यान लोकसभा निवडणुकीमध्ये सुजय विखे यांचा जनसंपर्क नाही किंवा ते लोकांशी संपर्क साधत नाही, असे मुद्दे पुढे घेत विरोधकांनी जोरदार प्रचार केला होता. मात्र, सत्ता असो किंवा नसो विखे कुटुंब कायम जनतेच्या पाठीशी असते, हे त्यांच्या कृतीतून दिसून आलं.