Download App

धीरूभाईंनी बाळासाहेबांना मुख्यमंत्रीपदासाठी सुचवलं होतं माझं नावं…, गणेश नाईकांचा गौप्यस्फोट

बाळासाहेब ठाकरे, धीरूभाई अंबानी हे चांगले मित्र होते. कधीतरी गप्पांच्या ओघात धीरूभाई अंबानींनी बाळासाहेबांना सांगितलं गणेश नाईकांना मुख्यमंत्री बनवा.

Ganesh Naik : बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) हे दिलदार व्यक्तिमत्व होते. मनात एक अन् डोक्यात एक असं त्यांच्या बाबतीत कधी घडलं नाही. पण, ते हलक्या कानाचे होते. कधी कोणी एखाद्याने त्यांचे कान भरले आणि ते त्यांना क्लिक झाले की ती गोष्ट ते मनात घर करून ठेवायचे. पण, त्यांना त्यांची चूक कळली तर ती चकू कबूल करण्यात त्यांनी कधी संकोचही बाळगला नाही, असं वनमंत्री गणेश नाई (Ganesh Naik) यांनी म्हटलं.

Pahalgam Terror Suspects : पहलगाम हल्ला, दहशतवादी श्रीलंकेत? विमानतळावर शोध मोहीम सुरु 

मुंबईतील एका कार्यक्रमात गणेश नाईक बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, एकदा डॉ. राणेंला बाळासाहेब बोलले की, गणेश नाईकला बोलवा. त्याला मुख्यमत्री करू. पण, चंदनाच्या पाटावरून आणि चांदीच्या ताटावरून एकदा उठलो की, परत बसणं नाही. स्वाभिमना आमच्या रगारगात आहे. पण बाळासाहेब जेव्हा आजारी पडले होते, तेव्ही मी त्यांना भेटायला गेलो होता. आमच्या मनात ठाकरेंविषयी कटूता नाही. आजही आमच्या विषयी ठाकरे लोक वाईट बोलू शकत नाही. आणि आम्ही देखील कधी ठाकरेंविषयी वाईट बोललो नाही, असं नाईक म्हणाले.

माजी मंत्री अन् आमदारांच्या हाती घड्याळ; प्रवेश होताच अजितदादांचा कार्यकर्त्यांना टास्क 

पवार साहेबांनी अजित पवारांना जशी तीन खाती दिली, तशी मला तीन खाती दिली. त्यांच्याशी आजही आमची कटुता नाही, असंही नाईक म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे, धीरूभाई अंबानी आणि प्रमोद महाजन हे चांगले मित्र होते. ते दर आठ ते पंधरा दिवसांनी धीरूभाई अंबानींकडे चर्चेसाठी जमत. तेव्हा कधीतरी गप्पांच्या ओघात धीरूभाई अंबानींनी बाळासाहेबांना सांगितलं गणेश नाईकांना मुख्यमंत्री बनवा. त्यानंतर मनोहर जोशींनी मला बोलावून घेतलं आणि कोण मुख्यमंत्री होईल, अशी विचारणा केली. उद्धव ठाकरे आणि मनोहर जोशींचं नाव घेतलं. आणि घडलंही तसंच. मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले, असं नाईक म्हणाले.

छगन भुजबळ यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र केल्यानंतर बाळासाहेबांनी माझ्यावर गटनेतेपदाची जबाबदारी जबदस्तीने टाकली. मी म्हटलं साहेब मी ज्यूनिअर आहे. पक्षात इतर ज्येष्ठ नेते असताना त्याला डावलून मला गटनेतेपद देणं हे मलाच आवडणार नाही. राजकारणात कोणतीही संधी सोडू नये असे म्हणतात. राजकारणात आज-काल तर इतरांना टांग मारून पुढं जायाची परंपरा आहे. पण, मी तसं कधी केलं नाही, असं नाईक म्हणाले.

follow us