बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून मनसे-उबाठा आमने-सामने; संदिप देशपांडेंचा उद्धव ठाकरेंवर थेट घाव

बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून मनसे-उबाठा आमने-सामने; संदिप देशपांडेंचा उद्धव ठाकरेंवर थेट घाव

Sandeep Deshpande on Balasaheb Thackeray Photo : बाळासाहेब ठाकरे जाऊन आता एक दशक झालं. मात्र, त्यांच्या राजकीय प्रभावाचा राजकारण आजही कायम आहे. आता त्यांच्या फोटोवरून राजकारण सुरू झालं आहे. (Thackeray ) तस, ते अनेक दिवसांपासून सुरूच आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केलं तेव्हापासून ते सुरू आहे. आता मनसेने यात उडी घेतल्याने या चर्चेने पुन्हा पेट घेतला आहे. मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याची शिवाजी पार्कवर जय्यत तयारी सुरू आहे. त्यासाठी लावण्यात आलेल्या बॅनरवर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो वापरण्यात आला आहे. त्यामुळे ही चर्चा आता सुरू झाली आहे.

उद्धव अन् राज ठाकरे एकत्र येणार? दानवे म्हणाले एकत्र यायचं की नाही यावर.

मनसेच्या बॅनरवर अनेक वर्षांनी बाळासाहेब ठाकरेंचा फोटो दिसला. जेव्हा ठाकरेंनी शिवसेना सोडली आणि मनसे पक्षाची स्थापना केली होती, त्यावेळी मनसेच्या बॅनरवर बाळासाहेबांचे फोटो असायचे. मात्रत, स्वत: बाळासाहेबांनी माझे फोटो वापरू नका असं म्हटलं होतं. तेव्हापासून मनसेच्या बॅनरवर बाळासाहेब दिसले नव्हते. आता बाळासाहेब बॅनरवर दिसल्यावर राजकीय वर्तुळात याची चर्चा रंगली आहे. उद्धव ठाकरेंनीही यावर प्रतिक्रिया देताना सगळ्यांनाच बाळासाहेबांचा फोटो वापरण्याशिवाय पर्याय राहिला नसल्याचं म्हटलं आहे. यावर मनसे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे.

काय म्हणाले संदीप देशपांडे?

माननीय बाळासाहेबांचा फोटो होर्डिंग वर लावणं हे पक्षाचं धोरण नाही. एखाद्या उत्साही कार्यकर्त्याची भावना असू शकते. मात्र, उद्धव ठाकरेंना माझा प्रश्न आहे महापौर बंगला घशात घालायचा होता तेव्हा बाळासाहेब देशाचे आणि एरवी ते फक्त तुमचे वडील असं कसं काय? असा सवाल करत संदीप देशपांडे यांनी ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे. दरम्यान, आगामी महापालिका तोंडावर असताना मनसे आता तयारीला लागली आहे. राज ठाकरेंनी पक्षामध्ये पदनिर्मिती केली असून हाच पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रात करणार असल्याचं सांगितलं आहे. राज ठाकरे पाडव्याला कोणावर निशाणा साधतात याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

गुरूवारी उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांना पत्रकारांनी मसनेच्या बॅनरबाबत प्रश्न विचारला होता. यावर बोलताना, सर्वांना बाळासाहेबांच्या नेतृत्त्वाशिवाय दुसरा पर्याय नाही हे त्यातून दिसत आहे. गेल्या वेळेला गद्दारांनीसुद्धा बाळासाहेबांनी फोटो वापरला तसं सगळ्यांनाच बाळासाहेबांचा फोटो वापरण्याशिवाय पर्याय राहिला नाही, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube