उद्धव ठाकरे मनसैनिकांची माफी मागणार का? संदीप देशपाडेंचा थेट सवाल…

Sandeep Deshpande News : भोंग्यांसाठी मनसैनिकांवर केसेस टाकल्या, यासाठी उद्धव ठाकरे मनसैनिकांची माफी मागणार का? असा थेट सवाल मनसे नेते संदीप देशपांडेंनी (Sandeep Deshpande) केलायं. हिंदी भाषा सक्तीच्या प्रकरणावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी हिंदी सक्तीसह इतरही विविध मुद्दे मांडले आहेत.
महाराष्ट्रातून मतदार यादीबाबत तक्रारींचा पाऊस; निवडणूक आयोगाने उचललं मोठ पाऊल, आता तुम्ही…
संदीप देशपांडे म्हणाले, भाजप हिंदुत्वाचं सर्टिफिकेट वाटत सुटलीयं. भाजपने असं सर्टिफिकेट वाटू नये, महाराष्ट्रप्रेमी महाराष्ट्रद्रोहीचं सर्टिफिकेट वाटू नये. भोंग्यांसाठी मनसैनिकांवर केसेस टाकल्या, यासाठी उद्धव ठाकरे मनसैनिकांची माफी मागणार का? असा थेट सवाल मनसे नेते संदीप देशपांडेंनी केलायं.
2014 आणि 2017 साली धोका मग आता विश्वास कसा ठेवायचा? मनसे नेते संदीप देशपांडेंचा ठाकरे गटाला सवाल
तसेच मराठी माणसांचं हित महत्वाचं आहे, त्यासाठी ठाकरे बंधूंचं काय तर सर्वच मराठी लोकांनी एकत्र आलं पाहिजे. मराठी माणसाच्या हिताच्या निर्णयाचा विचार करा. हिंदी सक्तीवरुन आवाज उठवालला हवा. राज ठाकरेंच्या भूमिकेला आपण निवडणुकीपुरतं पाहतोयं हे महाराष्ट्राचं दुर्देव आहे. महाराष्ट्र आणि मराठी या विषयासाठी सर्वच नेत्यांनी एकत्र यायला हवं. राज्यात आज अनेक विषय आहेत. हिंदी भाषा सक्ती उद्योग बाहेर चालले परप्रांतीय लोंढे, हिंदीभाषिकांची दादागिरी आहेत, या मुद्द्यांवर सर्व मराठी पक्षांनी या मुद्द्यांना विरोध केला पाहिजे, असंही देशपांडे म्हणाले आहेत.
आता राज्यातील शिक्षकांनाही गणवेश? शिक्षकांच्या गणवेशाबाबत शिक्षणमंत्र्यांचं मोठं वक्तव्य..
दरम्यान, महेश मांजरेकरांना दिलेल्या एका मुलाखतीत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना युतीसाठीचा प्रस्ताव ठेवलाय. एकत्र येणं यात मला फार काही कठीण वाटत नाही. आमच्यातील भांडणे महाराष्ट्राच्या हितापुढं किरकोळ आहेत, असं म्हणत राज ठाकरेंनी युतीचे सकेत दिले आहेत. त्याला उद्धव ठाकरेंनी सकारात्मक प्रतिसाद दिलाय… त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चा पुन्हा एकदा रंगू लागल्या आहेत.