महाराष्ट्रातून मतदार यादीबाबत तक्रारींचा पाऊस; निवडणूक आयोगाने उचललं मोठ पाऊल, आता तुम्ही…

EVM Machine : ईव्हीएम मशिनसह इतर अनेक मुद्यांवर विरोधकांनी रान माजवले आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत तर ही चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू झाली. ईव्हीएममध्ये गडबड केल्याप्रकरणात थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. तर, मतदार यादीत मोठ्या प्रमाणात गडबड झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. (EVM) महाराष्ट्रातून सर्वाधिक तक्रारी करण्यात आल्या होत्या. याप्रकरणात आता निवडणूक आयोगाने मोठी ॲक्शन घेतली आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने अनेक बदल करण्यात येणार आहे.
अडचण काय?
निवडणूक आयोगाकडे निवडणूक काळात अनेक तक्रारी येतात. या समस्या शोधण्यासाठी मतदार केंद्रनिहाय व्यवस्था करण्यात येणार आहे. मतदार यादी तयार करणे, मतदाना दरम्यान ईव्हीएमची व्यवस्था, देखभाल करणं. मॉक पोल, मतदानाचा टक्का याविषयीच्या ज्या तक्रारी करण्यात येणार त्याची इत्यंभूत माहिती घेऊन ती सोडवण्यात येईल. मतदान केंद्र अधिकारी आणि मतदान केंद्र एजंट यांना यासाठी लागलीच प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
Video : मोदी, शाह अन् फडणवीस कधीपासून हिंदू झाले?; राऊतांची नाशकातून तोफ धडाडली
निवडणूक आयोगाच्या मते, निवडणुकीसंबंधीत प्रत्येक प्रक्रियेसाठी एक निश्चित नियम आहे. निवडणुकीदरम्यान त्यात एखादी गडबड असेल तर त्यासाठी नियमांच्या पायऱ्यांचं पालन करणं आवश्यक आहे. काही किरकोळ तक्रारी असतात. काही चुका होतात. या तांत्रिक चुका असतात, त्या मुद्दाम केल्या जात नाही तर कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना माहिती नसल्याने त्या चुका होतात. त्याविषयी आता प्रशिक्षण देण्यात येईल.
50 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण
या तक्रारी आणि त्रुटीच्या अनुषंगाने मतदार केंद्र अधिकारी आणि एजंट यांना प्रशिक्षण सुरू रण्यात आल्या आहे. त्यात कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या चूका समोर आल्या आहेत. इतकंच नाही तर राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना सुद्धा निवडणूक नियम आणि प्रक्रियेसंबंधीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत मतदार केंद्रावर काम करणाऱ्या 50 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
मतदार यादीतील त्रुटी दूर करणार
मतदार यादीतील त्रुटी दूर करण्याचं मोठं आव्हान निवडणूक आयोगासमोर आहे. मतदार यादीतील त्रुटी दूर करण्यासाठी आयोगाने कंबर कसली आहे. मतदार यादी अपडेट करण्यासाठी आता प्रत्येक मतदार केंद्र निहाय राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींची मदत घेण्यात येणार आहे. त्याआधारे बोगस मतदार ओळखले जातील. मतदार यादी प्रकाशित करण्यापूर्वी राजकीय पक्षांचे आक्षेप आणि हरकती विचारात घेण्यात येईल. स्थानिक मतदार केंद्र, जिल्हा, राज्य आणि केंद्र स्तरावर छाननी झाल्यानंतरच अंतिम मतदार यादी प्रकाशित करण्यात येईल.
महाराष्ट्रातून सर्वाधिक तक्रारी
मतदार यादीत गडबड असल्याच्या अनेक तक्रारी देशभरातून करण्यात आल्या होत्या. त्यात सर्वाधिक तक्रारी महाराष्ट्रातून करण्यात आल्या होत्या. देशभरातून 89 तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्या सर्व महाराष्ट्रातील होत्या. तर इतर राज्यातील तक्रारी किरकोळ होत्या. आता या तक्रारींचे निरसन करण्यासाठी त्यावर उपाय करण्यात येणार आहे.