नगरचे कारभारी कोण? आज ठरणार, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी मतदान सुरु
Nagar Parishad Election : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी आज सकाळी 7 पासून मतदानाला
Nagar Parishad Election : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी आज सकाळी 7 पासून मतदानाला सुरुवात झाली आहे. आज राज्यातील 264 नगरपरिषदा आणि नगरपंचायतीसाठी मतदार होणार असून मतदान संध्याकाळी 5.30 पर्यंत करता येणार आहे. तर उद्या 3 डिंसेबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
2017 नंतर होणाऱ्या या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. तर दुसरीकडे या निवडणुकीत महाविकास आघाडी (MVA) आणि महायुतीमधील (Mahayuti) घटक पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यानंतर अनेक ठिकाणी महाविकास आघाडीमधील पक्षांमध्ये तर काही ठिकाणी महायुतीमधील घटक पक्षांमध्ये मुख्य लढत पाहायला मिळत आहे. त्यामुळेच प्रचारादरम्यान महायुतीमधील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेना (Shivsena) आणि भाजपच्या (BJP) नेत्यांमध्ये आरोप- प्रत्योरोप सुरु होते.
तर दुसरीकडे राज्य निवडणूक आयोगाने (Maharashtra Election Commission) मोठा निर्णय घेत मतदानाच्या काही तासांपूर्वी 20 पेक्षा जास्त नगरपरिषदेच्या निवडणुका रद्द केल्याने अनेकांना धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेत बारामती, फलटण, दिग्रस, पांढरकवडा, वणी, मंगळवेढा, कोपरगाव, देवळाली, नेवासा, पाथर्डी, घुग्गुस, अंजनगाव सुर्जी, धर्माबाद, मुखेड, बाळापूर, अनगर, बसमत, फुलंब्री आणि वाशिम नगर परिषदेच्या निवडणुका रद्द करत पुढे ढकल्या आहे.
व्यवसायात मिळणार यश अन् निर्माण होणार नवीन उत्पन्नाचे स्रोत; आजचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल?
12 नगरपरिषदा 3 नगरपंचायतीसाठी पुणे जिल्ह्यात आज मतदान
पुणे जिल्ह्यातील 12 नगरपरिषदा आणि ३ नगरपंचायतीसाठी आज पुणे जिल्ह्यात मतदान होत आहे. नगराध्यक्षपदासाठी पुणे जिल्ह्यात 76 उमेदवार आणि नगरसेवक पदासाठी 955 उमेदवार यांचा समावेश आहे. पुण्यात एकूण 524 मतदान केंद्रे आहे.
