Download App

‘Gautami’ ने गाजवली शिंदे गटाची दिवाळी पहाट; ठाकरे गटाने फोडले टीकेचे फटाके

Sushma Andhare On Shinde Group : दिवाळी पहाट कार्यक्रमाला ठाण्यातील टेंभीनाका परिसरात प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या(Gautami Patil) डीजे शोचं आयोजन करण्यात आलं होतं. शिंदे गटाच्या नेत्या आणि माजी महापौर मीनाक्षी शिंदे(Meenakashi Shinde) यांनी दिवाळी पहाट कार्यक्रम आयोजित केला होता. दिवाळी पहाटचा कार्यक्रम गौतमी पाटीलने लावणी सादर करीत गाजवला खरा पण विरोधकांनी शिंदे गटावर चांगलाच निशाणा साधल्याचं पाहायला मिळालं. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंंधारे यांनी या कार्यक्रमाचा व्हिडिओ एक्सवर शेअर करीत जळजळीत टीका केल्याचं दिसून आलं आहे.

राज्यभरात काल दिवाळी सणाचा उत्साह होता. राज्यातील अनेक भागांत दिवाळी पहाटनिमित्ताने सदाबहार गाण्यांचे कार्यक्रम घेत दिवाळी पहाटचा आनंद लुटल्याचं पाहायला मिळालं. मात्र, ठाण्यातील शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी चक्क गौतमी पाटीलच्या डीजे शोचं आयोजन केल्याचं दिसून आलं. दिवाळी दिवशीच सकाळपासून टेंभीनाका परिसरात गौतमी पाटीलचा कार्यक्रम सुरु होता. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गौतमी पाटीलचा बुके देत सत्कार केल्याचंही दिसून आलं. शिंदे गटाच्या या कृतीवरुन राज्यभरात विरोधकांकडून टीका केली जात आहे.

Tiger 3 : शोमध्ये चाहत्यांची हुल्लडबाजी; मालेगावमध्ये सिनेमागृहात फटाके फोडत प्रेक्षकांचा गोंधळ

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे पोस्टमध्ये म्हणाल्या, “दिवाळी पहाटनिमित्त आम्ही पं. बिस्मिल्ला साहेबांची सनई पं. भीमसेन जोशी यांचे भक्ती गीत किंवा पद्मजा फेणानी यांचा गोड गळा हे सगळं ऐकून होतो. ठाण्यामध्ये आज उजाडलेली दिवाळी पहाट ही वंदनीय बाळासाहेबांनाच काय अवघ्या महाराष्ट्राला सुद्धा अपेक्षित नसेल.” अशी जळजळीत टीका अंधारे यांनी केली आहे.

दारूच्या नशेत तर्रर्र असलेल्या मुलाकडून कट्टा हिसकावतांना आईलाच लागली गोळी

राज्यातील विविध जिल्ह्यांत दिवाळी पहाटचा कार्यक्रम उत्साहात सुरु होता. पुण्यातही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत गायिका बेला शेंडे यांच्या सदाबहार गीतांचा कार्यक्रम पार पडला. यावेळी पवार कुटुंबातील इतरही सदस्य एकाच मंचावर आल्याचं आपल्याला पाहायला मिळाले. मात्र, दुसरीकडे गौतमी पाटीलच्या लावणीने दिवाळी पहाटचा कार्यक्रम घेतल्याने शिंदे गटाच्या नेत्यांवर सोशल मीडियावर अनेकांकडून टीका केली जात आहे.

Telangana Election : 35 वर्षात तब्बल 237 निवडणुका; KCR यांना टक्कर देणारा ‘इलेक्शन किंग’ कोण?

तरुणाईने लुटला आनंद :
राज्यात कुठेही गौतमी पाटीलचा कार्यक्रम असला की गर्दी होणार हे जणू समीकरण बनलंय. दिवाळी पहाट कार्यकमासाठी गौतमी पाटील पहिल्यांदाच नृत्य सादर केल्याचं पाहायला मिळालं आहे. डिजेच्या दणदणाटासह गौतमीच्या ठसकेबाज लावणीवर ठाण्यातील तरुणांनी मनमुरादपणे दिवाळीचा आनंद लुटल्याचं दिसून आलं आहे.

दरम्यान, सुषमा अंधारे यांनी व्हिडिओ शेअर केल्यानंतर अनेक ट्रोलर्सनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती नसल्याचं मत अनेकांकडून व्यक्त केलं गेलं आहे. त्यामुळे आता विरोधकांच्या या टीकेवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकी कोणती भूमिका घेतील हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Tags

follow us