Download App

कोल्हापुरात अजित पवारांची ताकद वाढली; गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे राष्ट्रवादीत

कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक अरुण डोंगळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश केला.

  • Written By: Last Updated:

Arun Dongle Joined NCP Ajit Pawar group : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बळ वाढवणारी मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक अरुण डोंगळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश केला आहे. हा पक्षप्रवेश उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमाला कोल्हापूर जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

अजित पवार यांची ताकद

अरुण डोंगळे (Arun Dongle) यांच्या प्रवेशामुळे गोकुळ दूध संघातील (Gokul Dudh Sangh) समीकरणांवर परिणाम होणार आहे. आगामी जिल्हा राजकारणात अजित पवार (Ajit Pawar) यांची ताकद आणखी वाढेल, असा अंदाज वर्तवला (Politics) जात आहे.

पक्षाला शंभर हत्तींचे बळ मिळाले

कोल्हापूरमध्ये झालेल्या कार्यक्रमात मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाषण करत पक्षाच्या ताकदीवर विश्वास व्यक्त केला. अरुण डोंगळे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशामुळे ‘आमच्या पक्षाला शंभर हत्तींचे बळ मिळाले’, असे ते म्हणाले. डोंगळे यांना पक्षात येऊन चूक केली असे कधीच वाटणार नाही, त्यांच्या मान-सन्मानाची संपूर्ण काळजी घेतली जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. युतीबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, जिथे आमच्याकडून जमणार नाही तिथे मित्रपक्षांवर टीका न करता आम्ही लढू आणि आगामी निवडणुकीत युतीचा झेंडा फडकवू.

राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवणारच

यावेळी खासदार धैर्यशील महाडिक आणि आमदार क्षीरसागर यांच्यावरही त्यांनी टीका केली. कोल्हापूर महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवणारच, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. वेध धरला आहे, नेम चुकणार नाही, या शब्दांत त्यांनी निवडणुकीतील तयारी आणि आत्मविश्वास अधोरेखित केला.

राष्ट्रवादी अधिक मजबूत

यावेळी बोलताना सुनील तटकरे यांनी म्हटलंय की, हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील आज शेकडो सहकारी यांचा प्रवेश झाला. धुळ्यात माजी आमदार यांच्या नेतृत्वात अनेक सहकारी यांचा प्रवेश झाला. सोलापूरचे कार्याध्यक्ष यांच्या प्रयत्नातून अनेकांचा प्रवेश केला. त्यांचे सर्वांचे मनापासून स्वागत. या सगळ्यांच्या प्रवेशाने त्या-त्या भागात राष्ट्रवादी अधिक मजबूत होईल, असा पक्षाला विश्वास आहे. आज कोल्हापूर जिल्ह्यात युतीत पक्ष म्हणून गेले 30 वर्ष आपल्याला निवडणूकीला सामोरे जावे लागेल. आज ही समन्वय समितीची बैठक आहे. आम्ही महायुती म्हणून लढावे, असे ठरविले आहे. पण प्रत्येक ठिकाणी प्रमुख पक्ष आहेत त्यात त्यांच्यात एकमत होईलच असे नाही, असं देखील तटकरे यांनी म्हटलं आहे.

follow us