गोकुळमध्ये सतेज पाटलांना मोठा धक्का; महायुती सरकारकडून 4 शासननियुक्त संचालक नेमण्यास मंजुरी?

Gokul Milk Union Satej Patil; गोकुळमध्ये 4 शासननियुक्त संचालक नेमण्यास राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे.

Gokul Milk Union Satej Patil

Gokul Milk Union Satej Patil

Gokul Milk Union Satej Patil: कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघातील सत्तासंघर्षाला आता नवे वळण मिळण्याची शक्यता आहे. निवडणुकीत 25 पैकी 13 जागा जिंकून बहुमत मिळवलेल्या सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीसमोर महायुती सरकारच्या निर्णयामुळे नवे आव्हान उभे राहिले आहे. गोकुळमध्ये 4 शासननियुक्त संचालक नेमण्यास आणि त्यांना मतदानाचा अधिकार देण्यासंदर्भात राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. त्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडीत सत्तेचे गणित बदलण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

पायल झांबरेच्या मृत्यूप्रकरणी माहेरच्या कुटुंबाचा संताप; साडेसात वर्षे छळ केल्याचा आरोप, सासरच्यांवर गंभीर ठपका

नेमका निर्णय काय?

गोकुळ दूध संघात शासननियुक्त संचालकांची संख्या वाढवून 4 करण्याचा आणि त्यांना मतदानाचा अधिकार देण्याचा प्रस्ताव चर्चेत आहे. यासाठी सहकार कायद्यात बदल करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती आहे. मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर या 4 सदस्यांच्या नियुक्तीचा निर्णयाचा जीआर संध्याकाळपर्यंत निघणार असल्याची सुत्रांची माहिती आहे.

संचालक आल्यास काय बदलणार?

गोकुळच्या 25 संचालकांच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीचे 13, तर महायुतीचे 12 संचालक निवडून आले आहेत. म्हणजेच सतेज पाटील यांच्या गटाकडे एका जागेचे बहुमत आहे.

पुणे पोलीस दलात खळबळ; आयुक्तांच्या निवासस्थानाबाहेर कर्मचाऱ्याचा गोंधळ, कथित मद्यधुंद अवस्थेत शिवीगाळ

मात्र, महायुती सरकारने 4 शासननियुक्त संचालक नेमले आणि त्यांना मतदानाचा अधिकार मिळाला, तर महायुतीचे संख्याबळ 12 वरून 16 होऊ शकते. त्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडीत महायुतीला संख्याबळाचा फायदा मिळण्याची शक्यता आहे.

सतेज पाटलांचा निर्णयाला विरोध

सरकारच्या या संभाव्य निर्णयावर सतेज पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. निवडणुकीत बहुमत मिळाल्यानंतरही शासननियुक्त संचालकांच्या माध्यमातून संख्याबळ बदलण्याचा प्रयत्न होत असेल, तर निवडणुका घेण्याचा अर्थ काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. या निर्णयाविरोधात संविधानिक आणि कायदेशीर मार्गाने लढा देण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.

गोकुळ अध्यक्ष निवडणूक, बंटी पाटलांसाठी रवींद्र धंगेकर मैदानात; फोडला बॉम्ब

त्यामुळे गोकुळमध्ये निवडणुकीत मिळालेल्या बहुमतानंतरही अध्यक्षपद कोणाकडे जाणार, याबाबतचा पेच कायम आहे. शासननियुक्त संचालकांच्या नियुक्तीचा अंतिम निर्णय, त्यांना मिळणारा मतदानाचा अधिकार आणि त्याविरोधात होणारी संभाव्य न्यायालयीन लढाई यामुळे गोकुळमधील सत्तासंघर्षाकडे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचेच नव्हे तर राज्याचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version