Gopichand Padalkar : लोक म्हणतात, महाराष्ट्र (Maharashtra) हे पुरोगामी राज्य आहे, हे सर्व थोतांड आहे. महाराष्ट्र फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांवर चालतो, हे केवळ भाषणात सांगाय पुरतेच आहे, हे राज्य अत्यंत जातीयवादी आहे, हे पहिल डोक्यात फिट करून ठेवा, असं विधान भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी (Gopichand Padalkar) केलं.
जबरदस्तच, ‘ह्या’ 7 इलेक्ट्रिक कार्सवर तब्बल 3 लाखांचा डिस्काउंट, ऑफर फक्त 31 डिसेंबरपर्यंत
गोपीचंद पडळकर यांनी एका स्थानिक कार्यक्रमात बोलतांना हे विधान केलं. यावेळी बोलतांना पडळकांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. ते म्हणाले की, मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याकडे पाठपुरावा करून आपल्या भागासाठी मोठा निधी आणेन. त्यामुळं तुम्ही काळजी करू नका. इतर समाजाचे विषय असतील, तर तेही मला सांगा. मात्र, लोक म्हणतात महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे. पण हे सगळं थोतांड आहे. महाराष्ट्र फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांवर चालतो, हे फक्त भाषणात सांगण्यापुरतं आहे. हे राज्य अत्यंत जातीयवादी आहे हे डोक्यात फिट करून ठेवा. हे आपण बदलू शकत नाही, असं ते म्हणाले.
जबरदस्तच, ‘ह्या’ 7 इलेक्ट्रिक कार्सवर तब्बल 3 लाखांचा डिस्काउंट, ऑफर फक्त 31 डिसेंबरपर्यंत
पुढं ते म्हणाले, जातीजातीतल्या भिंती तोडून सगळ्या लोकांसाठी आपल्याला एकत्र काम करावं लागणार आहे. गावागावांत आपल्याला एकत्र यावं लागणार आहे. वैचारिक पातळीवर एकत्र यावे लागेल. अपने तो अपने होते, है, पराए अपने नहीं होते, हे ध्यानात ठेवा. माझी सारखी परीक्षा का बघताय? मी हात जोडून विनंती करतो, माझा फोनच उचलला नाही, बघितलंच नाही वगैरे सांगतात लोक. अरे कुणाकुणाचे फोन उचलू? बहिरा झालो मी आता, किती फोन येतात, असंही पडळकर म्हणाले.
जयंत पाटलांत धमक आहे?
यावेळी पडळकरांनी जयंत पाटील यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले की, महाविकास आघाडीची सत्ता गेली आहे. आता मी त्यावर जास्त बोलू नये. कुणाच्यात हिंमत असेल का सरकारच्या विरोधात लढयाची? सांगली जिल्ह्याचे नेते जयंत पाटील आहेत. सरकारविरोधात लढण्याची हिंमत त्यांच्यात आहे का? लढणं रक्तात असावं लागतं. पण हे लोक लगेच वळचणीला पळतात. लढू शकत नाही. त्यांच्यात हिंमत नाही, अशी टीका पडळकरांनी केली.