Gopichand Padalkar on Uddhav Thackeray : स्वातंत्र्यानंतर अनेक वर्ष संघाच्या कार्यालयावर तिरंगा फडकत नव्हता. त्यांचं फडकं फडकत होतं, अशी टीका ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) यांनी केली होती. त्यांच्या या टीकेला आता भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी (Gopichand Padalkar) भाष्य केलं. उद्धव ठाकरेंचा भगव्याशी काहीही संबंध राहिलेला नाही. त्यांचा संबंध हिरव्याशी आहे, अशी टीका पडळकरांनी केली होती.
Panchayat Season 3: ‘पंचायत सीझन 3’ रिलीजबाबत ॲमेझॉन प्राइमने दिली मोठी अपडेट
आज गोपीचंद पडळकरांनी माध्यमांशी संवाद साधला होता. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं होतं. यावेळी त्यांना उद्धव ठाकरेंच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या झेंड्याबाबतच्या वक्तव्याबाबत विचारले असता ते म्हणाले, बाळासाहेबांचे पुत्र एवढ्या खालच्या थराला जातील, असं वाटलं नव्हते. भगवा हा आमचा अभिमान आहे. आम्हाला भगव्याविइषयी प्रचंड आस्था आहे. आता ठाकरेंचा भगव्याशी संबंध राहिलेला नाही. त्यांचा संबंध आता हिरव्याशी आहे. पण त्याचा त्यांना आयुष्यभर पश्चाताप राहील, असे पडळकर म्हणाले.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
एका मुलाखतीत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, जेपी नड्डा म्हणाले होते – देशात एकच पक्ष असेल. पूर्वी एक विधान, एक निशाण, एक प्रधान म्हणाले होते. आधी आम्हाला वाटले की ते हे तिरंग्यासाठी करत आहेत. पण, स्वातंत्र्यानंतर अनेक वर्ष यांच्या कार्यालयावर तिरंगा फडकत नव्हता. याचं फडकं फडकत होतं. ते फडकं देशाचं निशान होऊ शकत नाही. आमच्या देशाचा तिरंगा हा तसाच राहणार. संविधान तसंच राहणार. प्रधान लोकांनी निवडून दिलेलाच राहणार. पुतीन सारखा निडडून येणार नाही, असं म्हणत त्यांनी संघावर टीका केली.
पडळकर पुढे म्हणाले, ‘जे देश आणि राज्यात पंतप्रधान मोदींना विरोध करत आहेत. त्यांचा आवाका किती आहे? त्यांना खूप मर्यादा आहेत. डबक्यातील बेडके डराव डराव करतात, तशा पद्धतीने ही लोकं महाराष्ट्रात बोलत आहेत. त्यामुळं मला राज्यातील जनेतला विनंती करायची आहे की, त्यांनी त्यांच्या नादाला लागून काही उपयोग नाही. 4 जूननंतर त्यांची तोंड काळी झाल्याशिवाय राहणार नहाीत, असा हल्लाबोल पडळकरांनी केला.
पवारांनी दुसऱ्यांची घरे फोडली
याशिवाय पडळकर यांनी करत शरद पवारांवरही टीका केली आहे. ते म्हणाले, शरद पवारांचा पक्ष आता अडचणीत आला आहे. त्यांची राजकीय वेळ संपली आहे. त्यांचे घरातीलच वाद मिटेना. त्यांनी आयुष्यभर दुसऱ्यांची घरे पाडण्याचे काम केलंय, असा हल्लाबोल पडळकरांनी केला.