…आणि उद्धव ठाकरेंनी ‘ती’ घोषणा देणं बंद केलं; देवेंद्र फडणवीसांचा घणाघात

मुंबईतील प्रचारसभेत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यानी घोषणा बदलली असं म्हणत विरोधकांवर जोरदार टीका केली.

...आणि उद्धव ठाकरेंनी 'ती' घोषणा देणं बंद केलं; देवेंद्र फडणवीसांचा घणाघात

PM Modi campaign meeting in Mumbai : या शिवाजी पार्कवरून बाळासाहेब ठाकरे यांची गर्जना ऐकू यायची. ती म्हणाजे.”तमाम माझ्या हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो” अशी ही गर्जना बाळासाहेब ठाकरे करायचे. मात्र, काल परवापर्यत अशी गर्जना करणारे उद्धव ठाकरे यांनी आता इंडिया आघाडीच्या भीतीने ही घोषणा देण बंद केलं असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी उद्धव ठाकरेंवर केला. ते मुंबईत प्रचार सभेत बोलत होते.

 

मृतांच्या टाळूवरील लोणी खाललं

बाळासाहेब ठाकरे काय बोलत होते. हिंदूत्व, मुंबई, मराठी माणूस अशा गोष्टींवर थेट बाळासाहेब ठाकरे बोलायचे. मात्र, उद्धव ठाकरे काय बोलत आहेत. तर, काँग्रेसला मतदान करा. पक्ष चोरला, वडिल चोरले, उखडून फेकणार असं म्हणत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. तसंच, यावेळी कोरोना काळाचा उल्लेख करत यांच्या काळा मेलेल्या माणसाच्या टाळूवरील लोणी खाण्याचं काम झालं अशी टीकाही फडणवीस यांनी केली आहे.

 

आरोपी स्टार प्रचारक

आज हे लोकस टीपू सुलतानच्या नावाने घोषणा दिल्या जातात. केजरीवाल आणि राहुल गांधींसाठी पाकिस्तानमधून ट्विट केलं जात असं म्हणत आम्हाला वाटल उद्धव ठाकरे वेगळे असतील परंतु तस नसून बॉम्बस्फोटमधील आरोपी यांचा स्टार प्रचारक आहे असं म्हणत फडणवीस यांनी टीका केली आहे.  त्याचबरोबर हे काँग्रेसला मत द्या म्हणून सांगत आहेत काय यांच्यावर वेळ आली असंही फडणवीस म्हणाले आहेत.

follow us