Download App

मराठा आरक्षणावर सरकारचा केवळ वेळकाढूपणा, मुख्यमंत्र्यांच्या निवेदनानंतर विरोधक आक्रमक

Maratha Reseravation : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज सभागृहात मराठा आरक्षणावर (Maratha Reseravation) निवेदन सादर केले. मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारीत विशेष अधिवेशन घेणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. यानंतर महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) आमदारांनी सभात्याग केला. सरकारला आरक्षण देता येत नसल्याने मराठा समाजाला गाजर दाखवण्यात असल्याचा आरोप करत घोषणाबाजी केली.

यावेळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणावरील चर्चेला उत्तर देताना आरक्षण नेमके कसे देणार, याबाबत आज ना कोणती पुढील दिशा सांगितली, ना कोणती कालमर्यादा स्पष्ट केली. ही मराठा समाजाची शुद्ध फसवणूक आणि दिशाभूल असल्याचे म्हटले आहे.

Manoj Jarange : शिंदेंची फेब्रुवारीची मुदत मान्य नाही; मनोज जरांगेंनी स्पष्टच सांगितलं…

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले की, आजचे मुख्यमंत्र्यांचे भाषण म्हणजे खोदा पहाड निकला चुहा असा आहे. सरकारने 24 डिसेंबरपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेल असे सांगितले होते. मुख्यमंत्र्यांच्या भाषणात ओबीसींच्या समस्यांवर कुठेही चर्चा झाली नाही. आमच्या सरकारच्या जुन्याच योजना मुख्यमंत्र्यांनी नव्याने सांगितल्या असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे. निवडणुकीपर्यंत सरकारने वेळ मारुन नेली आहे. आचरसंहिता आली की आरक्षणाचा विषय संपवायचा आहे, अशी टीका त्यांनी केली.

जरांगेंच्या डेडलाईनला केराची टोपली! मराठा आरक्षणाचा निर्णय फेब्रुवारीत; CM शिंदेंची मोठी घोषणा

24 तारखेपर्यंत मराठा समाजाला आरक्षण देण्यात सरकार अपयशी ठरले आहे. सरकार आता गाजर दाखवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी केला आहे. आजच्या उत्तरातून मुख्यमंत्र्यांनी वेळ मारून नेली आहे. त्यांच्याकडे कोणताही ठोस निर्णय नाही हे त्यांच्या उत्तरातून दिसून आलं आहे. किती कुणबी सर्टिफिकेट दिले हे त्यांनी सांगितले नाही. मुख्यमंत्र्यांचा हा वेळकाढूपणा असल्याची टीका त्यांनी केली.

Tags

follow us