Download App

मोठी बातमी! पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर; ‘या’ दिवशी होणार मतदान

Graduates and Teachers Constituencies Election : देशात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. राज्यातील 48 जागांपैकी जास्तीत जास्त जागा

Graduates and Teachers Constituencies Election : देशात सध्या लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election) रणधुमाळी सुरू आहे. राज्यातील 48 जागांपैकी जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीकडून (MVA) जोरदार प्रचार होताना दिसत आहे. तर दुसरीकडे आता केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक (Graduates and Teachers Constituencies Election) मतदारसंघाच्या चार जागांसाठी निवडणूक जाहीर केले आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मुंबई आणि कोकण विभागात शिक्षक, पदवीधर मतदार संघांची निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. याच बरोबर मुंबई शिक्षक आणि नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी निवडणुका जाहीर करण्यात आले आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील महिन्यात म्हणजेच जून 10 रोजी ही निवडणूक होणार आहे तर 13 जून रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार, 15 मेपासून उमेदवाराला अर्ज दाखल करता येणार आहे तर 22 मे अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे.

मुंबई पदवीधर मतदारसंघ

गेल्या निवडणुकीत या मतदारसंघातून शिवसेनेचे विलास पोतनीस यांनी बाजी मारली होती. त्यांच्या कार्यकाळ 7 जुलै रोजी संपणार आहे.

कोकण पदवीधर मतदारसंघ

कोकण पदवीधर मतदारसंघात गेल्या निवडणुकीत भाजपचे निरंजन डावखरे विजयी झाले होते त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नजीब मुल्ला यांच्या पराभव केला होता.

मुंबई शिक्षक मतदारसंघ

लोकभारतीचे आमदार कपिल पाटील यांनी गेल्या निवडणुकीत मुंबई शिक्षक मतदारसंघात सर्वांना धक्का देत बाजी मारली होती. त्यांनी गेल्या निवडणुकीत भाजप पुरस्कृत अनिल देशमुख यांच्या पराभव केला होता.

शरद पवारांच्या वक्तव्याने काँग्रेस नेते सुखावले; वडेट्टीवार म्हणतात, “आता NDA चा सुपडा साफ…”

नाशिक शिक्षक मतदारसंघ

गेल्या निवडणुकीत नाशिक शिक्षक मतदारसंघात शिवसेना पुरस्कृत उमेदवार किशोर दराडे यांनी बाजी मारली होती. त्यांनी भाजपचे अनिकेत पाटील यांचा पराभव केला होता.

follow us

वेब स्टोरीज