Download App

आनंद एवढाच की, ठाकरे घराबाहेर पडले; विखेंनी ठाकरेंना डिवचलं

  • Written By: Last Updated:

सोलापूर : रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची विराट सभा होत आहे. सत्तासंघर्षानंतर पहिल्यांदाच ते खेड येथे येणार असून शिवसैनिकांशी आणि जनतेशी संवाद साधणार आहेत. पण, त्याआधीच भाजपचे नेते आणि महसुल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe-Patil) यांनी उद्धव ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. आनंद एवढाच आहे की, ते घराबाहेर पडले आहेत. ते आता फेसबुकवर सभा घेत नाहीत, अशा शब्दात विखेंनी ठाकरेंवर खोचक टीका केली आहे.

उद्धव ठाकरे यांची खेडमध्ये माजी आमदार संजय कदम यांच्या प्रवेशानिमित्त सभा होत आहे. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन शिंदे गटात गेलेले माजी मंत्री रामदास कदम आणि त्यांचे चिरंजीव योगेश कदम यांच्या होम ग्राउंडवर ठाकरेंची सभा होत आहे. दरम्यान, याच सभेच्या पार्श्वभूमीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदान निशाणा साधला. विखे म्हणाले, राजकीय पक्षांच्या सभा होतच राहणार ते पक्षाचे नेते आहेत, त्यात वेगळं काय आहे? आनंद एवढाच आहे की, ठाकरे आता घराबाहेर पडले आहेत. फेसबुकवर ते सभा घेत नाहीत. तेवढाच काय तो बदल आता लोकांना दिसत असल्याचं विखेंनी सांगिलतं.

देशातील नऊ विरोधी पक्षांच्या नेत्यांचे मोदींना पत्र; पत्रास कारण की….; अनेक मुद्द्यावर वेधलं लक्ष

दरम्यान, ठाकरे गटाचे सर्वेसेवा उद्धव ठाकरे यांची महत्त्वपूर्ण जंगी सभा आज खेडमध्ये होणाऱ्या सभेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ठाकरे गटाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात रवाना झाले आहेत. या सभेमध्ये गुहागर मतदारसंघातील बहुसंख्ये कार्यकर्ते हे राष्ट्रवादीतून ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादीचे माजी आमदार संजयराव कदम हे देखील याच मेळाव्यात शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. यामुळे उद्धव ठाकरे यांचा गट अधिक सक्षम होणार असल्याची चिन्हं आहेत.

Tags

follow us