Harshvardhan Patil : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhansabha Election) सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली. लोकसभा निकालानंतर राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहे. निवडणुकीआधी फूल फॉर्ममध्ये असलेली महायुती काहीशी बॅकफुटवर गेली. अशातच आता महायुतीत (Mahayuti) जागावाटपावरून रस्सीखेच पाहायला मिळतेय. त्यामुळे भाजप नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांच्या कार्यकर्त्यांनी पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची मागणी केली. त्यावर आता पाटील यांनी भाष्य केलं.
Paris Olympics 2024 मनू भाकर करणार पदकांची हॅट्ट्रिक? शानदार कामगिरी करत पुन्हा फायनलमध्ये
इंदापूरची जागा सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार 2019 प्रमाणेच इंदापूरची जागा सोडणार नाहीत. ते हर्षवर्धन पाटलांना पुन्हा दगा देतील हे ओळखूनच हर्षवर्धन पाटलांच्या कार्यकर्त्यांनी बंडाचे हत्यार उपसले. त्यांनी अपक्ष निवडणुक लढवण्याची मागणी केली. याविषयी हर्षवर्धन पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, सध्या निवडणुकीचं वातावरण सुरू झालं आहे. आमच्या कार्यकर्त्यांची संख्या खूप मोठी आहे. गेल्या काही वर्षात आमच्या कार्यकर्त्यांवर अन्याय झाला. अपक्ष निवडणुक लढावी ही कार्यकर्त्यांची भावना आहे. लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. प्रत्येकजण आपल्या भावना व्यक्त करत असतो. मात्र, एक गोष्ट स्पष्ट करायची आहे की, महायुतीच्या जागावाटपाचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही, असं ते म्हणाले.
मातोश्रीत बसून धमकीची भाषा षंढच करू शकतो; मोदी-फडणवीसांसाठी राणेंनी तलवार उपसली
महायुती होणार यावर शिक्कामोर्तब
पुढं बोलतांना त्यांनी सांगितलं की, आमची कोअर कमिटीची बैठक झाली. त्यामध्ये महायुती होणार यावर शिक्कामोर्तब झालं. मात्र, कोणत्या जागा कोणाकडे जाणार? याबाबत आमचे वरिष्ठ नेते चर्चा करतील. याबाबत केंद्रीय नेतृत्व चर्चा करेल. त्यामुळे जागावाटपाबाबत अंतिम प्रक्रिया झालेली नाही. दुसरी भाग म्हणजे, महाविकास आघाडीतही याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही.
हर्षवर्धन पाटील म्हणाले, लोकसभा निवडणुकीवेळी मी, आमचे नेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आम्ही विस्ताराने चर्चा केली होती. त्यावेळी असं ठरलं की, देवेंद्र फडणवीस जो निर्णय घेतील, तो सर्वांना मान्य असेल. मात्र, निर्णयापर्यंत ती प्रक्रिया आलेली नाही. मला वाटतं लोकसभेवेळी जी चर्चा झाली, त्याबाबतची स्पष्टता जागा वाटपावेळी होईल.
आम्ही 25 कोटींची विकासकामे केली...
आम्ही नेहमी लोकांच्या संपर्कात राहतो. गेल्या 10 वर्षांपासून मी संविधानिक पदावर नसलो तरी आमचे तळापर्यंत कार्यक्रम असतात. आम्ही सुमारे 25 कोटी रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटने केल्याचं पाटील यांनी सांगितलं.